ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा मानाचा दादासाहेब फाळके पूरस्कार जाहीर झालाय. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना २०१४ या वर्षासाठीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

Updated: Mar 23, 2015, 11:08 PM IST
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  title=

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा मानाचा दादासाहेब फाळके पूरस्कार जाहीर झालाय. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना २०१४ या वर्षासाठीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

शशी कपूर यांचं खरं नाव बलबीर राज कपूर आहे. पृथ्वीराज कपूर यांचे ते पुत्र...वडील आणि भावांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनीही चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकलं. शशी कपूर यांनी ४०व्या दशकापासूनच काम करायला सुरूवात केली होती. पण खरी सुरूवात १९६१ मध्ये आलेल्या 'धर्मपुत्र'पासून झाली. शंभरहून अधिक सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

शशी कपूर यांना २०११मध्ये 'पद्मभूषण' या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
७७ वर्षीय शशी कपूर यांनी दिवार, कभी कभी, सत्यम शिवम सुंदरम, नमक हलाल या चित्रपटातील अभिनयातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शशी कपूर यांना दमदार अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.