शिकाऱ्याची शिकार

गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या शिकारीच्या या घटना घडल्या आहेत...कधी सापळा लावून तर कधी तारेचा फास लावून तर कधी वीजेचा शॉक देवून वाघाची शिकारा केली जातेय. त्यामुळे जंगलात मुक्तपणे संचार करणा-या या प्राण्याचं जीवन धोक्यात आलंय.

Updated: May 4, 2012, 10:57 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

उमदा , देखणा, आणि शक्तीचं प्रतिक असलेला प्राणी म्हणजे वाघ...त्याची ऐट काही वेगळीच असते ....वाघाची एक झलक पाहण्यासाठी वन्यजीव प्रेमी तासन् एका जागेवर तास खिळून बसतात ...मात्र गेल्या पाच महिन्यात या रुबाबदार प्राण्यावर संकट घोंगाऊ लागलंय...गेल्या पाच महिन्यात चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात शिका-यांनी वाघांचा घात केलाय..

 

जंगलात त्याचा मुक्त संचार आहे... त्याच्या पावलांची चाहूल लागताच इतर प्राण्यांचे कान टवकारल्या शिवाय राहात नाहीत.. त्याच्या डरकाळीने जंगलाचा कोणा न कोणा  थरारून जातो. कारण अवघ्या जंगलावर त्याचं अधिराज्य आहे. महाराष्ट्रतल्या अभयारण्यात आजही वाघाची डरकाळी ऐकायला मिळते.वाघ मोठ्या चतुराईने आपलं सावज हेरतो ... एकदा का सावज त्याच्या टप्प्यात आलं की ते  त्याच्या तावडीतून सूटनं अशक्य  असतं.. जंगलावर राज्य करणा-या वाघावर मात्र शिका-याची काळी छाया गेल्या काही वर्षात गडद होवू लागलीय..एकापाठोपाठ एक वाघाच्या शिकारीच्या घटना घडत आहेत...

 

 जानेवारी 2012

ठिकाण : झरण, चंद्रपूर

वीजेचा शॉक देऊन वाघाची शिकार

 

फेब्रुवारी 2012

ठिकाण : लोहारा, चंद्रपूर

एका वाघिणीचा मृत्यू

 

मार्च 2012

ठिकाण :चंद्रपूर शहरालगत

एका वाघाचा मृत्यू

 

एप्रिल 2012

ठिकाण : पळसगाव

सापळा लावून वाघाची शिकार 

एक  वाघ जखमी

-------------------

  मार्च 2012

ठिकाणी : केळापूर, यवतमाळ

एका वाघाचा मृत्यू

 

गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या शिकारीच्या या घटना घडल्या आहेत...कधी सापळा लावून तर कधी तारेचा फास लावून तर कधी वीजेचा शॉक देवून वाघाची शिकारा केली जातेय. त्यामुळे जंगलात मुक्तपणे संचार करणा-या या प्राण्याचं जीवन धोक्यात आलंय...शिका-याकडून कधी त्याचा घात होईल याचा नेम नाही. विदर्भात  मेळघाट, ताडोबा- अंधारी आणि पेंच या ठिकाणी व्याघ्रप्रकल्प आहेत आणि वाघाच्या शिकारीच्या घटनाही  याच परिसरात सतत घडत आहेत. गेल्या पाच महिन्यात राज्यात पाच वाघांना ठार करण्यात आलं  आहे. त्यामुळे या प्राण्याच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उभं राहीलय. वाघांची शिकार रोखण्याची जबाबदारी ही वन संरक्षकांची आहे. पण वाघाच्या शिकारीच्या घटना काही कमी होताना दिसत  नाहीत.

 

खरं तर एक चपळ शिकारी म्हणून ज्याची ख्याती आहे तो वाघचं आज शिकार ठरु लागला आहे. वाघाची शिकारी करण्यासाठी शिकारी टोळ्या अत्यंत क्रूर पद्धतीचा वापर करतात. एकदा का वाघ त्यांच्या सापळ्यात अडकला की त्याचा मृत्यू  अटळ असतो.कारण शिका-यांनी वाघाचा पुरता अभ्यास केला आहे... 

 

आंतराष्ट्रीय पातळीवर वन्यप्राणांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांची वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पावर वळली आहे. त्यामुळे या अभयारण्यातील वाघांवर संकट घोंघावू लागलं आहे. 27 एप्रिलला चंद्रपूरच्या पळसगावात