खासगीकरणातून रत्नागिरीत आंग्रे पोर्ट

महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर रत्नागिरीपासून जवळच असलेल्या जयगड किल्ल्याच्या आडोशाला खासगीकरणातून आंग्रे पोर्ट उभारण्यात आले आहे. देशातील बहुदा हा पहिलाच खासगी करणाचा प्रयत्न आहे. या बंदराचे अक्षय तृतियेला उद्घाटन करण्यात आले.

Updated: Apr 25, 2012, 11:45 AM IST

www.24taas.com,  सांडे लागवण, जयगड  

 

 

महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर  रत्नागिरीपासून जवळच असलेल्या जयगड किल्ल्याच्या आडोशाला खासगीकरणातून आंग्रे पोर्ट  उभारण्यात आले आहे. देशातील बहुदा हा पहिलाच  खासगीकरणाचा प्रयत्न आहे.  या बंदराचे अक्षय तृतियेला उद्घाटन करण्यात आले.

 

 

 

चौगुले समुहाने अवघ्या ६७५ दिवसात विकसित केलेले आंग्रे बंदर हे राज्यातील पहिले बहुद्देशिय खासगी बंदर ठरले आहे. बंदर निर्माणाबरोबरच जहाज बांधणी क्षेत्रातील आघाडीचा हा समूह जहाज दुरुस्ती क्षेत्रातही या रुपाने पदार्पण केला आहे.  मराठा आरमाराचे पहिले प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या दूरदृष्टिकोनातून राज्यातील सागरी किनाऱ्याचा विकास १७ व्या शतकात झाला होता. त्यामुळे या बंदराला आंग्रे पोर्ट असे नाव देण्यात आले आहे.

 

 

 

चौगुले समूहाचे विश्वासराव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली १९६८ मध्ये पहिली मुंबई - गोवा प्रवासी वाहतूक जयगड परिसरात सुरू झाली होती. त्यानंतर सागरी किनाऱ्यावरीलच जयगड किल्ल्याचे अस्तित्व ओळखून चौगुले समूहाने २००० च्या सुमारास येथे बंदर विकसित करून बॉक्साईटच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले होते. विश्वासराव चौगुले यांचे ज्येष्ट पुत्र विजय चौगुले यांच्या पुढाकाराने आता याच जयगड बंदरावर ४५० मीटर लांब व ४३ मीटर रुंद अशी जेट्टी बांधण्यात आली आहे. याठिकाणी एकाचवेळी चार जहाजांवरील मालवाहतूक हाताळता येणार आहे.

 

 

 

नैऋत्य वाऱ्याचा येथे असलेल्या कमी प्रवाहामुळे जहाजांच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवता येणार आहे. येथील पाण्याची पातळी १० मीटर खोल आहे. त्याचबरोबर येथून कर्नाटकातील बेळगाव, कारवार ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे ते थेट नांदेडपर्यंतची औद्योगिक वाहतूक जोडली जाणार आहे.  चौगुले समूहातील जयगड पोर्ट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे विकसित करण्यात आलेले कान्होजी आंग्रे बंदर हे जयगड किल्ल्याजवळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ल्यानजीक असणाऱ्या सांडे लागवण येथील हे बंदर मुंबईपासून ११० आणि गोव्यापासून १२६ सागरी मैलावर तर राष्ट्रीय महामार्ग व कोंकण रेल्वे मार्गापासून ४५ किलोमीटरवर आहे. मुंबईच्या जेएनपीटीपासून २०० आणि गुजरातमधील मुंद्रा बंदरापासून १,२१२ किलोमीटरवर हे बंदर आहे.

 

 

आंग्रे बंदरासाठी जयगड कंपनीने ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर येथेच विकसित करण्यात येत असलेल्या जहाज दुरुस्तीसाठी ४३० कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत. जहाज दुरुस्ती जून २०१३ पासून सुरू करण्यात येणार आहे. बंदर  ३१० एकर तर जहाज दुरुस्ती ही ३५ एकर जागेवर होणार आहे. १० हजार टनपेक्षा कमी क्षमतेच्या जहाजांची येथे दुरुस्ती केली जाईल. तसेच कोलंबो, संयुक्त अरब अमिरात येथून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या जहाजांची दुरुस्ती येथे होईल. एका वेळी सहा जहाजे दुरुस्ती करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

 

साखरेबरोबरच अन्नधान्याच्या इतर वस्तू, कृषी व रासायनिक पदार्थ यांचीही निर्यात करता येणार आहे. या बंदराची सध्याची जहाज वाहतूक हाताळणी क्षमता १.६ कोटी टनवरून लवकरच २.५ कोटी होईल, असा विश्वास आंग्रे बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला. या बंदराच्या माध्यमातून ८०० रोजगार उपलब्ध झाल्याचेही ते म्हणाले. पर्यावरण आणि जमीन यांच्या सुलभतेमुळेच हे बंदर कमी कालावधीत अस्तित्वात येऊ शकले, असेही त्यांनी सांगित