मॉडेल, मर्डर आणि मायाजाल

सिमरन सूद.....मायानगरी मुंबईतील एक असा सुंदर चेहरा...ज्याच्या विषयी ना फारसं कुणी ऐकलं होतं.. ना कुणी तिला फारसं ओळखत होतं..पण जेव्हा तो सुंदर चेहरा प्रसिद्धीत आला तेव्हा मृत्यूचं एक भयंकर जाळंच सर्वांसमोर आलं.

Updated: Apr 25, 2012, 12:08 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

सिमरन सूद.....मायानगरी मुंबईतील एक असा सुंदर चेहरा...ज्याच्या विषयी ना फारसं कुणी ऐकलं होतं..  ना कुणी तिला फारसं ओळखत  होतं..पण जेव्हा तो सुंदर चेहरा प्रसिद्धीत आला तेव्हा मृत्यूचं एक भयंकर जाळंच सर्वांसमोर आलं...  हे असं  चक्रव्यूह आहे  ज्यामध्ये कुणी प्यादा आहे......  कुणी शिकारी...  तर कुणी सावज....पण या चक्रव्यूहातील प्रत्येकजण एका सुंदर चेह-याशी जोडला गेला आहे...तो चेहरा आहे मुंबईतील मॉडेल सिमरन सूद हिचा...मॉडेल, माफिया आणि खुनाचं रहस्य या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे सिमरन सूद...

 

अरुण टिक्कू खून प्रकरणी सिमरन सूदवर पोलिसांना संशय आहे. पण  ती केवळ या एकाच प्रकरणात अडकलीय असं नाही तर करन कक्कड हत्या प्रकरणी तिच्यावर संशय असून  आता विवेका बाबाजीच्या मृत्यू प्रकरणीही सिमरन सूदवर  संशयाची सुई वळलीय. गौतम वोराच्या अटकेमुळं विवेका बाबाजीचं प्रकरण पुन्हा बाहेर आलाय.  विवेका बाबाजीचा मित्र गौतम वोराला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अरुण टिक्कू खून प्रकरणातील आरोपी विजय पलांडेला आश्रय दिल्याचा गौतम वोरावर आरोप आहे. मॉडेल  सिमरनशी आरोपी विजय पालांडेचे संबंध आहेत. मॉडेल आणि माफिया   या  जोडगोळीवर  टिक्कू आणि कक्कर खूनप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप आहे.

आरोपी मॉडेल सिमरन सूदने रचलेलं षडयंत्र अत्यंत  घातक असं होतं. तिच्या त्या मोहक चक्रव्यूहात केवळ दोघांनाच जीव गमवावा लागलाय, असं नाही तर मॉडेल विवेक बाबाजीच्या मृत्यूलाही ते कारणीभूत ठरल्याचा संशय आहे.अरुण टिक्कू आणि करन कक्कडच्या हत्येमागे संपत्ती आणि पैसा कारणीभूत असल्याचं मानलं जातंय..मात्र विवेका बाबाजीच्या रहस्यमय मृत्यूमागे  मानसिक ताणतणाव कारणीभूत असल्याचं आतापर्यंत मानलं गेलंय.

 

पण पोलीस  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम वोरा आणि विवेका बाबाजी यांच्यातल्या संबंधांमध्ये तिसरी व्यक्ती आली होती..आणि त्यामुळेच विवेका बाबाजीचा मानसिक ताणतणाव वाढला होता....त्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती सिमरन सूद असल्याचं बोललं जातयं. गौतम आणि सिमरन सूद यांच्यात त्यावेळी मधूर संबंध असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. अरुण टिक्कू खूनप्रकरणी तपासादरम्यान  माफिय़ा पलांडे आणि मॉडेल सिमरन सूद हे दोघे पोलिसांच्या हाती लागले आहे..पण या प्रकरणाची चौकशी करतांना  एक खून आणि  मृत्यूच्या रहस्यावरचा पडदा दूर होणार आहे.

 

अरुण टिक्कूंच्या हत्येप्रकरणी विजय पालांडे आणि सिमरनला पोलिसांनी अटक केलीय.पण  आता विवेका बाबाजीच्या मृत्यूप्रकरणीही मॉडेल सिमरनचा संबंध जोडून पाहिला जाण्याची शक्यता आहे . विजय पालांडे आणि गौतम वोरा यांच्यातली मैत्री उघड झाल्यानंतर  ही चर्चा सुरु झालीय. अरुण टिक्कू खून प्रकरणी सिमरन सूद, विजय पलांडे, आणि  गौतम वोराचं नावही आता समोर आलं आहे...टिक्कू खून प्रकरणाचा तपास करत असतांना एक गोष्ट स्पष्ट झाली असून ती म्हणजे सिमरन सूद ही ब-याच काळापासून गौतम वोराच्या संपर्कत होती..गौतम वोराच्या वकिलांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार , सिमरनने गौतमची विजय पलांडेशी ओळख करुन दिली होती...विजय आपला भाऊ असल्याचं सिमरनने गौतमला सांगितलं होतं..पलांडेने आपलं नाव करन सूद असल्याचं त्यावेळी  सांगितल्याचा दावा गौतमच्या वकिलांनी केलाय.

 

विजय पलांडे हा आपलं नाव करन सूद असल्याचं सांगत असे..मयत अरुण टिक्कूचा मुलगा अनुज यालाही त्याने आपलं नाव करन सूद असंच सांगितलं होतं..तसेच त्यांची ओळख सिमरनने करुन दिली होती....अरुण टिक्कू खून प्रकरणाचा तपास करत असतांना विजय पलांडेकडं गौतम वोराचा फोननंबर आढळून आल्यानंतर पोलिसांना गौतमवर संशय आला.  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय पलांडेच्या मोबाईल फोनमध्ये गौतम वोराची माहिती पोलिसांना मिळाली होती..त्यावरुन पोलिसांनी  विजयकडं चौकशी केली आणि गौतमशी असलेल्या त्याच्या मैत्रीचा खुलासा झाला..

 

10 एप्रिल 2012 रोजी विजय पालांडे जेव्हा पोलिसांच्या तावडीतून निसटला तेव्हा त्याला  गौतम वोराने मदत क