www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे.. NEET ही सामायिक प्रवेश परीक्षा सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे. खासगी शिक्षण संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात, असा महत्त्वाचा निकाल न्यायालयानं दिलाय. यंदाचे प्रवेश मात्र झालेल्या परीक्षेनुसारच होतील, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय.
सामायिक प्रवेश परीक्षेसाठी मेडिकल काऊंसिलनं काढलेल्या अधीसूचनेविरोधात ११५ याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्यावर ३ न्यायाधीशांच्या खंडपीठानं २ विरुद्ध १ मतानं हा निर्णय़ दिला. सरन्यायाधीश अल्तमास कबीर आणि न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांनी NEET रद्द करण्याच्या बाजूनं मत नोंदवलं. तर न्यायमूर्ती अनिल दवे यांनी NEETच्या बाजूनं मत मांडलं. यामुळे देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी एकच परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना अपयश आलंय. एमसीआयनं केलेल्या याचिकेवर कोर्टानं हा निकाल दिलाय.
यंदा पहिल्यांदाच NEET झाली होती. त्यामुळे यंदाची प्रवेश प्रक्रिया त्यानुसारच घ्यावी, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. पुढल्या वर्षापासून मात्र खासगी कॉलेजना स्वतःची प्रवेश परीक्षा घेता येईल...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.