www. 24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
आंध्र प्रदेशातल्या पी.साई संदीप रेड्डीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT साठी घेण्यात आलेल्या JEE अडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावलाय.
तर ए रवी चंद्रा हा या परीक्षेत दुसरा आला आहे. पी. साई संदीप हा सरकारी शाळेतल्या शिक्षकाच्या मुलगा आहे. यासाठी घेण्यात येणा-या जेईई परीक्षेत त्यानं ३६० पैकी ३३२ गुणांची कमाई केलीय. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे संदीपचे आदर्श असून आता तो मुंबई - IIT मध्ये कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेणार आहे.
मुंबई विभागात मोहित शहानं अव्वल क्रमांक पटकावलाय. मोहितनं मोहितने ३६० पैकी २८७ गुणांची कमाई केलीय. प्रत्यक्षात एक लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी जेईई-अडव्हान्स ही परिक्षा दिली. त्यापैकी अवघे १५,९४७ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.