युवराज म्हणतो, सगळ्याचा बदला घेणार...

गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत हिंदुस्थानला ४-० अशा फरकाने पराभूत करीत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.

Updated: Nov 9, 2012, 11:18 PM IST

www.24taas.com, चंदिगड
गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत हिंदुस्थानला ४-० अशा फरकाने पराभूत करीत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. आता या पराभवाची व्याजासकट परतफेड करण्याची वेळ आली असल्याचा विश्‍वास हिंदुस्थानी कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या युवराज सिंगने गुरुवारी व्यक्त केला.
इंग्लंडने मायदेशात खेळताना आम्हाला हरवले. आता इंग्लंडवर ती पाळी येणार आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या मालिकेत हिंदुस्थानी संघ मैदानात उतरणार तो बदला घेण्यासाठीच. केव्हीन पीटर्सनच्या पुनरागमनामुळे इंग्लंड संघाला बळकटी मिळाली असली तरी आम्ही मालिका जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार.
उभय देशांमधील मालिका अटीतटीची होण्याची शक्यता आहे. पण आम्ही त्या पराभवाचा वचपा काढणारच, असे युवी आवर्जून पुढे म्हणाला.