परदेशात टीम इंडिया फेल, सीरिज गमावली

वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 1, 2014, 08:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.
परदेशात पराभूत होण्याची टीम इंडियाची मालिका न्यूझीलंडमध्येही कायम राहिलेली पाहायला मिळाली. पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील अखेरच्या वेलिंग्टन वन-डेतही भारतीय टीमला किवींकडून ८७ रन्सनं सपाटून मार खावा लागला. या वन-डेतही धोनी अँड कंपनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरली. न्यूझीलंडनं भारतासमोर ३०४ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करतांना टीम इंडिया २१६ रन्सवरच ऑल आऊट झाली.
भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. तर कॅप्टन धोनीनं ४७ रन्स करत थोडाफार प्रतिकर कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे सारे प्रयत्न अपुरे पडले. या दोघांचा अपवाद वगळता भारताच्या एकाही बॅट्समनला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेत जे पाहयला मिळालं त्याचाच ऍक्शन रिप्ले न्यूझीलंडमध्ये पाहायला मिळाला.
२०१५च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीनं भारतासाठी ही वन-डे सीरिज अतिशय महत्त्वपूर्ण होती. मात्र, याचा कुठलाही फायदा धोनीच्या युवाब्रिगेडनं उचलला नाही. किवींनी भारतीय टीमचा ४-०नं धुव्वा उडवला आणि भारतीय टीमच्या ताऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. या सीरिज पराभवामुळं भारताला वन-डेमधील आपलं अव्वल स्थानही गमवावं लागलं. आता भारतीय टीम मॅनेजमेंटला टीम इंडियाबाबत काही ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.