www.24taas.com , झी मीडिया , नवी दिल्ली,
आयपीएलच्या नव्या सिझनसाठी ६५१ खेळाडूंचा समावेश ` अनकॅप्ड ` खेळाडूंच्या श्रेणीत करण्यात आलेला आहे. ज्या खेळाडुंनी यापूर्वी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्या खेळाडूंचा `अनकॅप्ड ` श्रेणीत समावेश होतो. उन्मुक्त चंद , ऋषी धवन यासारख्या भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश या श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे.
फ्रेंचाइजीना खेळाडूंची यादी पाठवण्यात आली आहे. आपल्या पसंतीच्या खेळाडूंची निवड यादी आयपीएलच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ फ्रेंचाइजींना देण्यात आला आहे. त्यानंतर खेळाडूंच्या लिलावासाठी अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे.
मनीष पांडे, उन्मुक्त चंद, रजत भाटिया, ऋषी धवन, इक्बाल अब्दुल्ला आणि टी. सुमन या शिवाय इतरही खेळाडूंचा समावेश आयपीएल च्या नव्या सिझनसाठी करण्यात आला आहे. भारतातील विविध राज्याशिवाय आठ देशातील खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे.
`अनकॅप्ड ` खेळाडूंची यादी दोन वेगवेगळ्या विभागात करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत जे खेळाडू यापूर्वी आयपीएल खेळलेले आहेत अशा १२७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात नवोदित ५२४ खेळाडूंचा समावेश असेल.
` अनकॅप्ड ` खेळाडुंचे आधारमूल्य १० ते ३० लाखांपर्यंत निर्धारित करण्यात आले आहे. तीस लाखांच्या आधारमूल्य असलेल्या खेळाडूंमध्ये इक्बाल अब्दुल्ला ,टी. सुमन ,उन्मुक्त चंद हे खेळाडू आहेत. रणजीतील सर्वाधीक बळी घेणाऱ्या ऋषी धवन आणि आयपीएल मध्ये शतक ठोकणाऱ्या मनीष पांडेला वीस लाखांच्या आधारमूल्य असलेल्या गटात स्थान देण्यात आले आहे.
वेगवान शतक ठाकणाऱ्या कोरी अंडरसनला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वाधीक बोली लागण्याची शक्यता आहे. कोरी अंडरसनने आपल आधारमूल्य केवळ २ डॉलर इतक कमी ठेवले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.