भारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.

Updated: Mar 26, 2015, 06:46 PM IST
भारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा title=

नवी दिल्ली: भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.

मात्र या ट्विट्सदरम्यान सर्वात जास्त धक्कादायक ट्विट केलंय बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याने. भारताच्या दारूण पराभवानंतर लगेचच वर्मानं ट्विट केलं,'भारताच्या या निराशाजनक पराभवामुळं मी खूप खूप आहे, कारण मला क्रिकेट आवडत नाही आणि जगात अशी दुसरी कोणतीही बाब नाहीय, ज्याचा मी राग करतो.'

वर्मानं आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलंय, मी क्रिकेटचा राग करतो कारण माझं आपल्या देशावर प्रेम आहे. भारतात लोकं क्रिकेटमुळं कामं सोडून देतात. त्यामुळं देशाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

राम गोपाल वर्मानं आग, रण, सरकार, भूत, अब तक छप्पन सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. असं पहिल्यांदाच घडलं नाहीय की, राम गोपाल वर्मानं अशाप्रकारचं वादग्रस्त ट्विट केलं. यापूर्वी रामगोपाल वर्मानं अमिताभ बच्चन यांना शिवीगाळ करणारं ट्विट केलं होतं. त्यावेळी वर्मानं बिग बीसोबत आपली घट्ट मैत्री असल्याचं सांगितलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.