पाहा आज कोणाला आली युवराजची आठवण!

आज भारताला पराभूत होतांना पाहतांना एका खेळाडूची फार आठवण येत होती. तो खेळाडू म्हणजे भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग. 

Updated: Mar 26, 2015, 06:04 PM IST
पाहा आज कोणाला आली युवराजची आठवण! title=

मुंबई : आज भारताला पराभूत होतांना पाहतांना एका खेळाडूची फार आठवण येत होती. तो खेळाडू म्हणजे भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग. 

२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारत असाच नाजूक स्थितीत असतांना युवराजनं मैदानात येऊन ३० चेंडूत ७० धावांची ती खेळी सर्वांनाच आठवत असेल. त्या मॅचमध्येही भारताची टॉप ऑर्डर पूर्ण कोलमडली होती. त्यावेळी युवराजच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर भारतानं त्या सामन्यात विजय मिळवला होता.

२०११च्या वर्ल्ड कप जिंकण्यामध्येही युवराज सिंगचा मोलाचा वाटा होता. त्या मॅचमध्ये ५७ धावांची नाबाद खेळी केली होती, तसंच ४४ रन देऊन दोन विकेटही घेतल्या होत्या. त्या मॅचमध्ये सुद्धा टॉप ऑर्डर कोलमडल्यावर युवराज मैदानात खंबीरपणे उभा राहिला होता.

टीम इंडियाच्या काही फॅन्सचं म्हणणं आहे की, हे सगळं आठवतांना युवराज आज पाहिजे होता मॅच कदाचित हातातून गेली नसती असंच वाटतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.