केवीन पीटरसनला सक्तीची निवृत्ती

इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन आणि माजी कॅप्टन केविन पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मानहानीकारक पराभवानंतर नव्यानं संघाची बांधणी करण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डानं घेतला होता. त्यावर आणि पहिली कुऱ्हाड पीटरसनवर पडली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 6, 2014, 09:49 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन आणि माजी कॅप्टन केविन पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मानहानीकारक पराभवानंतर नव्यानं संघाची बांधणी करण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डानं घेतला होता. त्यावर आणि पहिली कुऱ्हाड पीटरसनवर पडली.
आगामी वेस्ट इंडीज दौरा आणि पुढच्या महिन्यात बांगलादेशात होणाऱ्या २०-२० वर्ल्ड कपसाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं पीटरसनला संघात स्थान दिलेलं नाही. त्यामुळं त्याचं इंग्लंड क्रिकेट संघाशी असलेलं नऊ वर्षं जुनं नातं संपलंय. ईसीबीचे अधिकारी पॉल डाउंटन यांनी पीटरसनला या निर्णयाची गेल्या आठवड्यात कल्पना दिली, तेव्हा तोही हादरलाच होता. आपल्या कारकीर्दीचा शेवट इतका चमत्कारिक होईल, असा विचार त्यानं स्वप्नातही केला नसेल. त्यामुळंच ही सक्तीची निवृत्ती स्वीकारणं त्याला जड जातंय.
३३ वर्षीय पीटरसन जन्मानं दक्षिण आफ्रिकेचा. पण इंग्लंडकडून खेळताना त्याची कारकीर्द बहरली. अर्थात मैदानाबाहेर संघ सहकारी आणि प्रशिक्षकांशी वादविवादांमुळंही तो वारंवार चर्चेत राहिला.
पीटरसनची कारकीर्द
> २००४ मध्ये इंग्लंडच्या वनडे संघात आणि २००५ मध्ये कसोटी संघात पदार्पण
> १०४ कसोटी सामन्यांमध्ये २३ शतकांच्या सहाय्यानं ८१८१ रन्स, तर वनडेमध्ये ४४४० रन्स (सरासरी ४०.७३)
> इंग्लंडकडून तो ३७ टी-२० मॅचेस खेळला आणि त्यात ११७६ रन्स
आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यानं पीटरसन दुःखी आहे, मात्र आयपीएलमध्ये तो खेळत राहणार आहे. इंग्लंडच्या संघाला त्यानं भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.