www.24taas.com , झी मीडिया, चेन्नई
एन. श्रीनिवासन पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्षपदी पुन्हा एकदा ते विराजमान झाले असले तरी, त्यांना कोर्टाच्या याचिकेवर निर्णय आल्याशिवाय पदभार स्वीकारता येणार नाही. बिहार क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या विरोधात याचित दाखल केली आहे. तर उपाध्यक्षपदी रवि सावंत, राजीव शुक्ला, चित्रक मित्रा, शिवलाल यादव आणि स्नेह बंसल असणार आहेत. संदय पटेल बीसीसीआय सेक्रेटरी म्हणून कायम असतील. तर अनुराग ठाकूर जॉईंट सेक्रेटरी असतील.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढलेले असतानाही एन. श्रीनिवासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास सज्ज झाले होते. विरोधात कोणताच उमेदवार नसल्यामुळं त्यांची बिनविरोध निवड निश्चिचत होती.
श्रीनिवासन यांचे जावई गुरूनाथ मयप्पन यांच्यावर सट्टेबाजीसंदर्भात आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे जगमोहन दालमिया यांच्याकडे देण्यात आली होती. आता पुन्हा श्रीनिवासन यांच्याकडे सूत्रे गेली आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.