www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्ली टेस्टच्या सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन १६४ रन्समध्ये ऑल आऊट झालीय. भारतीय स्पिनर्ससमोर कांगारुंच्या बॅट्समनची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.
टेस्टच्या तिस-या दिवशी भारताला इनिंग २७२ रन्सवर ऑल आऊट केल्यानंतर बॅटिंगला उतरलेल्या कांगारुंना भारतीय स्पिनर्ससमोर टीकावच धरता आला नाही. पिटर सिडल वगळता कांगारुंचा एकही बॅट्समन चांगली खेळी करु शकला नाही.
आर. अश्विन, रवींद्र जाडेजा आणि प्रज्ञान ओझाच्या फिरकीपुढे कांगारुंनी अक्षरश: लोटांगण घातल. आता ऑस्ट्रेलियाला ४-०ने क्लीन स्विप देण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.
ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद झाल्यानंतर जम बसवू पाहणाऱ्या स्टिव्ह स्मिथला रवी जडेजाने १८ रन्सवर बाद केले तर त्याच्या पाठोपाठ मिशेल जॉन्सन याला भोपळा फोडण्याचीही संधी जडेजाने दिली नाही. त्यामुळे ७ बाद ९४ अशी अवस्था झाली.
या बिकट परिस्थितीत मैदानात उतरलेल्या सिडलने चक्क फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने ताबडतोब जम बसवत एकदिवसीय सामन्याप्रमाणे फलंदाजी करून ४५ चेंडूत ५० रन्स केल्या. फिरकी गोलंदाजांकडून इशांत शर्माकडे चेंडू सोपवूनही त्याचा बळी घेण्यात लवकर यश आले नाही. अश्विनच्या एका चेंडूवर कर्णधार धोनीने सिडलला यष्टीचीत करून कांगारुंचा डाव संपुष्टात आणला.