सराव सामन्यात पाककडून भारत पराभूत

टी-20 प्रॅक्टिस मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. भारतानं ठेवलेलं 186 रन्सचं आव्हान पाक टीमनं कामरान अकमलच्या नॉटआऊट 92 रन्सच्या जोरावर पार केलं. तर शोएब मलिकनही नॉटआट 37 रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2012, 06:43 PM IST

www.24taas.com, कोलंबो
टी-20 प्रॅक्टिस मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. भारतानं ठेवलेलं 186 रन्सचं आव्हान पाक टीमनं कामरान अकमलच्या नॉटआऊट 92 रन्सच्या जोरावर पार केलं. तर शोएब मलिकनही नॉटआट 37 रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली.
भारताकडून आर. अश्विन वगळता एकाही बॉलर्स फारशी कमाल करता आली नाही. त्यानं पाकिस्तानच्या चार बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. झहीर खान, इरफान पठाण, लक्ष्मीपती बालाजी आणि हरभजन सिंगला एकही विकेट घेता आली नाही. तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि विराट कोहीलच्या नॉटआऊट 75 रन्समुळे 185 रन्सपर्यंत मजल मारली. त्यानं रोहित शर्माबरोबर तिस-या विकेटसाठी 127 रन्सची पार्टनरशीप केली. रोहित आणि विराट वगळता भारताच्या एकाही बॅट्समनला काहीच कमाल करता आली नाही.
दरम्यान, बॅट्समननी 185 रन्स करूनही भारतीय बॉलर्सना पाक बॅट्समनना रोखण्यात अपयश आलं. प्रॅक्टिस मॅचमध्ये बॉलर्सनी निराशा केल्यानं पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बॉलर्सच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.