भारतीय `यंगिस्तान`ची हॅट्रीक; ऑस्ट्रेलियाचा चक्काचूर!

‘अंडर १९ वर्ल्डकप’मध्ये यंगिस्तानची एकच धमाल उडवून दिलीय. कॅप्टन उन्मुक्त चंदची शानदार सेंच्युरी आणि स्मित पटेलच्या हाफ सेंच्युरीच्या साहाय्यानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 26, 2012, 01:11 PM IST

www.24taas.com, क्विन्सलँड
‘अंडर १९ वर्ल्डकप’मध्ये यंगिस्तानची एकच धमाल उडवून दिलीय. कॅप्टन उन्मुक्त चंदची शानदार सेंच्युरी आणि स्मित पटेलच्या हाफ सेंच्युरीच्या साहाय्यानं भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवलाय.
भारतानं ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सने पराभूत करत ‘अंडर-१९ वर्ल्डकप’चं अजिंक्यपद पटकावलं. कॅप्टन उन्मुक्त चंदच्या १११ रन्सच्या जोरावर भारतानं वर्ल्डकप विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजयासह भारतानं तिसऱ्यांदा वर्ल्डकप विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. याआधी भारतानं २००० आणि २००८ मध्ये वर्ल्डकप विजेतेपद पटकावलं होतं.

‘अंडर-१९ वर्ल्डकप’ फायनलमध्ये भारताचा कॅप्टन उन्मुक्त चंद यानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बॅटींगसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं भारतीय टीमसमोर २२६ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून संदीप शर्मानं सर्वाधिक चार विकेट्स घेत कांगारु बॅट्समनना रोखून धरलं होतं.
ऑस्ट्रेलियाकडून विल्यम बॉसिस्टोनं नॉटआऊट ८७ रन्सची इनिंग खेळली.

यावर उत्तरादाखल भारताचा कॅप्टन उन्मुक्त चंदनं सेंच्युरी ठोकली तर त्याला स्मित पटेलनं हाफ सेंच्युरी ठोकून उत्तम साथ दिली. उन्मुक्तनं १२५ बॉलमध्ये ५ सिक्स तर ७ चौके ठोकत शतक पूर्ण केलं. शतकानंतरही त्यानं एक सिक्स मारलाच. ८४ धावांवर ऑस्ट्रे लियाच्या७ बॅसिस्टोिने चंदची कॅच सोडली अन् हाच सामन्याकचा निर्णायक क्षण ठरला.