प्रितीला ईडीचा सवाल, ‘कुठून जुळविले आयपीएलसाठी पैसे?’

चित्रपट अभिनेती आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालकीण प्रिती झिंटा हीची मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’नं चौकशी केली.

Updated: Mar 6, 2013, 11:56 AM IST

www.24taas.com, मुंबई
चित्रपट अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालकीण प्रिती झिंटा हीची मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’नं चौकशी केली.
किंग्ज इलेव्हन पंजाबमधील शेअर्सबाबत ‘ईडी’नं प्रितीची तब्बल सात तास चौकशी केली. आयपीएलच्या दुसऱ्या सीझनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबात ही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएलचा दुसरा सीझन दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. यामध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी ‘ईडी’कडे आल्या होत्या.
प्रिती आईपीएल फ्रेंचायजी ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ ची सहमालकीण आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रितीनं ही रक्कम कुठून जुळवली, असाही प्रश्न यावेळी तिला विचारण्यात आला. ३८ वर्षीय अभिनेत्रीनं सात तासांच्या चौकशीत ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत.

२००९ मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी जेव्हा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेची निवड करण्यात आली त्यावेळी कोणत्या फ्रेंचायजीमध्ये मनी लॉन्ड्रींगद्वारे पैसे गुंतविले गेलेत का? याबद्दल ईडी चौकशी करत आहे.