www.24taas.com, हैदराबाद
नुकतंच चेतेश्वर पुजाराचं लग्न झालंय आणि हैदराबाद टेस्टमध्ये त्यानं डबल सेंच्युरी झळकावलीय. या कामगिरीसाठी पुजारालाच प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं. त्याची पत्नी पूजा हिला लग्नापूर्वीपासूनच ‘लकी गर्ल’ म्हणून ओळखली जातेय. पण, कदाचित यामुळेच पुजाला त्यांच्या लग्नानंतर चेतेश्वरच्या फॉर्मचं जबरदस्त टेन्शन आलं होतं.
सध्या भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर सीरीज ही पुजाराच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतेय. काही दिवसांपूर्वीच त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये प्रवेश केलाय. ‘लकी गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजाला त्यामुळे जास्त चिंता लागली होती, ही गोष्ट स्वत: पुजारानंच ट्विटच्या माध्यमातून सांगितलीय. लग्नानंतर चांगल्या खेळासाठी त्याला दबाव जाणवत होता. हीच चिंता पूजालाही सतावत होती की या सीरिजमध्ये पूजाराचा खेळ कसा असेल?
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्ध्या डझनपेक्षा जास्त मॅच खेळलेल्या पुजाराचे वडील यावेळी मैदानावर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनीच सगळ्या घराला सांभाळलंय. २००५ मध्ये चेतेश्वरच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच ते प्रत्येक वेळेस त्यांच्या मुलाची सोबत करू शकत नाहीत.
चेतेश्वरच्या म्हणण्यानुसार, पूजा खरोखरच त्याच्यासाठी खूप भाग्यशाली आहे. आईच्या मृत्यूनंतर उदासवाण्या घराला तिनं पुन्हा तजेलपणा दिलाय. कोणत्याही खेळाडूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणं हे खूप मोठी आव्हान असतं. त्यासाठी भावनात्मक नियंत्रण हीदेखील महत्त्वाची गोष्ट ठरते. पण, लग्नानंतर आता मात्र पुजाराला ही गोष्ट अजिबात सतावत नाहीए. चेतेश्वर आणि पूजा यांचं गेल्या महिन्यात म्हणजे १३ फेब्रुवारीला झालंय.