www.24taas.com, झी मीडिया, न्यूझीलंड
एका बॉलमध्ये १२ रन्स काढणे, जादूची बॅट आणली तरी शक्य होणार नाही. पण क्रिकेटच्या अनिश्चित खेळात हे शक्य झाले आहे.
मात्र न्यूझीलंडमधील टी टवेन्टी सामन्यात ही किमया घडली होती. हा सामना काही वर्षांपूर्वी खेळला गेला होता. या सामन्यात २ चेंडूत १२ रन्स हवे होते. एक चेंडू वाया गेला. त्यावेळी समीकरण झाले १ चेंडू १२ रन्स त्यावेळी गोलंदाजाने फुलटॉस बॉल टाकला. त्यावर बॅटेची कड घेऊन बॉल सीमारेषेच्या पार गेला. त्या सामन्यात नो बॉलला २ रन्स होते. मग त्या नो बॉलवर ६ रन्स झाले. मग समीकरण झाले १ चेंडू आणि ६ धावा. शेवटच्या चेंडूवर अॅडम्सने षटकार लगावून हा सामना जिंकला.
हा टवेन्टी टवेन्टी सामना न्यूझीलंड ऑकलंड आणि नाईट्स टीममध्ये एक टी ट्वेण्टी सामना खेळण्यात आला आहे.
अॅडम्सने फक्त एका चेंडूत तब्बल 12 धावा करून ऑकलंड संघाला विजय मिळवून दिला. म्हणून अँड्रे अॅडम्सला ऐतिहासिक फिनीशर घोषित करण्यात आलं.
पाहा खालील व्हिडीओत कसे काढले एका चेंडूत 12 रन्स
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.