www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीचा पाळीव प्राण्यांवर किती जीव आहे, हे जगजाहीर आहे. तो नेहमीच आपल्या पाळीव कुत्र्यांबाबत ट्वीट करत असतो. शनिवारी धोनीनं ट्विटरवर आणखी एक निर्णय जाहीर केलाय.
येत्या एका वर्षाच्या आत धोनी एका विशिष्ट जातीचे कुत्रे विकत घेणार आहे. त्या कुत्र्यांचा फोटो सुद्धा धोनीनं इंस्टाग्रामवर टाकला. हे पहिल्यांदा नाही की धोनीनं सोशल नेटवर्किंग साईटद्वारे आपलं पाळीव प्राण्यांबद्दलचं प्रेम जाहीर केलं असेल.
धोनी जवळ अगोदरच तीन कुत्रे आहेत. त्यांची नावं जारा (लेबराडोर), जोया (वीनमारनर) आणि सॅम (मिक्स्ड ब्रीड) आहे.
धोनी नेहमीच या कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतो. याशिवाय 2014मध्ये त्यानं एका लावारिस कुत्र्याच्या पिल्लाला दत्तक घेतलं होतं. या कुत्र्याला रांचीच्या होप अँड अॅनिमल ट्रस्ट संघटनेच्यावतीनं वाचवण्यात आलं होतं.
मात्र असं नाहीय की धोनीचा फक्त कुत्र्यांवर जीव आहे. तर 2011मध्ये धोनीनं म्हैसूरच्या चमाराजेंद्र झूलॉजिकल पार्कच्या एका वाघालाही दत्तक घेतलं होतं. या वाघाचं वय 12 वर्ष असून त्याचं नाव अदगस्त्या आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.