पाहा ट्रेलर- `धूम ३` चं दुसरं मोशन ट्रेलर

‘धूम ३’ सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकतचा वाढवल्यावर आताधूम ३चं दुसरं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अत्यंत हुशारीने यावेळी यशराज फिल्म्स `धूम३` ची उत्सुकता वाढवत आहेत. मोशन पोस्टरचा प्रकार यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 1, 2013, 05:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘धूम ३’ सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकतचा वाढवल्यावर आताधूम ३चं दुसरं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अत्यंत हुशारीने यावेळी यशराज फिल्म्स `धूम३` ची उत्सुकता वाढवत आहेत. मोशन पोस्टरचा प्रकार यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे.
पहिल्या पोस्टरमध्ये आमिर खानच्या कातीव देहयष्टीशिवाय फारशी कुठलीही गोष्ट दिसली नव्हती. तर या मोशन पोस्टरमध्ये ३ डी स्टाईल दाखवण्यात आली आहे. सिनेमात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ आहे, हे यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. धूम सीरिजमध्ये बाईक्सचे स्टंट हे प्रमुख वैशिष्ट्य असतं. ‘धूम ३’ च्या या मोशन पोस्टरमध्ये बाईकचा स्टंट दिसतो.
आमिर खान सोबत ‘धूम’ परंपरेतले अभिषेक बच्चन, उदय चोप्राही या पोस्टरमध्ये दिसतात. तर कतरिना कैफचं सौंदर्यही या पोस्टरमध्ये दिसतं. सर्वंच्या २ डी पोस्टरवर ३ ग्राफिक्सने बनवलेली आगही लक्षवेधी आहे.
विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘धूम ३’ सिनेमा २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.