शर्लिन चोप्राने नग्न होऊन दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

शर्लिन चोप्रा यंदाच्या दहीहंडीत कुठेच दिसली नाही. मात्र सकाळी सकाळीच तिने इंस्टाग्रामवर जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र नुसतीच शुभेच्छा देऊन ती थांबली नाही. तर, आपला नग्न फोटोही तिने या शुभेच्छांसोबत अपलोड केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 29, 2013, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकीकडे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत हे. अनेक सेलिब्रिटींना ठिकठिकाणी दहीहंडीसाठी आमत्रणं येत आहे. यामध्ये कुठेच नसलेल्या शर्लिनने पुन्हा आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी नग्न फोटो टाकत जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.
शर्लिन चोप्रा यंदाच्या दहीहंडीत कुठेच दिसली नाही. मात्र सकाळी सकाळीच तिने इंस्टाग्रामवर जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र नुसतीच शुभेच्छा देऊन ती थांबली नाही. तर, आपला नग्न फोटोही तिने या शुभेच्छांसोबत अपलोड केला.
काहीवेळाने हाच फोटो तिने ट्विटरवर अपलोड केला. “दिवसाची सुरूवात करण्यापूर्वी सर्वांना हॅपी जन्माष्टमी म्हणते. सर्वांना खूप प्रेम ” अशा शब्दांत शर्लिनने ट्विट केलं आहे.

शर्लिन सध्या रुपेश पॉलच्या कामसूत्र ३डी या सिनेमात काम करत आहे. या सिनेमातही तिला काम मिळण्याचं कारण तिची नग्न होण्याची तयारीच असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या शुभेच्छाही तिने नग्न होतच दिल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.