सलमान खानचा साखरपुडा, कोण आहे ती?

बॉलिवू़डचा दबंग सलमान खानचा साखरपुडा झाला होता. हे कोणाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. सात वर्षे प्रेमप्रकरण केल्यानंतर सल्लूने साखरपुडा केला. लग्नाची पाहिलेली स्वप्न मात्र, अधुरी राहिलीत. आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सलमानला २५ वर्षे पूर्णही झालीत. त्यानिमित्ताने त्याच्या गॉसिपची चर्चा सुरू झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 29, 2013, 05:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवू़डचा दबंग सलमान खानचा साखरपुडा झाला होता. हे कोणाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. सात वर्षे प्रेमप्रकरण केल्यानंतर सल्लूने साखरपुडा केला. लग्नाची पाहिलेली स्वप्न मात्र, अधुरी राहिलीत. आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सलमानला २५ वर्षे पूर्णही झालीत. त्यानिमित्ताने त्याच्या गॉसिपची चर्चा सुरू झाली.
सोमी आज ३७वर्षांची आहे. सलमान आणि सोमीचे सात वर्षे अफेअर होते. त्या दोघाचा साखरपुडाही झाला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर चार महिन्यांतच त्यांचे ब्रेकअप झाले. आज सोमी खूश आहे ती तिच्या कामात. मात्र, तिने आपल्या ब्रेकअपला अॅशलाच जबाबदार धरले आहे. तसे सोमीने एका मुलाखतीत सांगितले, सलमान आणि तिच्या ब्रेकअपचे कारण ऐश्वर्या राय होती. माझे आणि सलमानचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मात्र आमच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही, कारण आमच्या दोघांत ऐश्वर्या राय आली होती. त्याकाळात सलमान संजय लीला भन्साळीच्या `हम दिल दे चुके सनम` या सिनेमात ऐश्वर्याबरोबर काम करत होता.
सोमी पुढे सांगते, `हम दिल दे चुके सनम` या सिनेमादरम्यान सल्लूचे सूत ऐश्वर्याबरोबर जुळले. असे असले तरी आता तिच्या मनात कुणाबद्दलही राग नाही. मी आता आयुष्यात खूप पुढे गेली आहे. सलमानने दगा दिल्यानंतर सोमी अमेरिकेला परतली. अमेरिकेत गेल्यानंतर सोमीने पुढचे शिक्षण घेतले.
सोमीने मियामी युनिव्हर्सिटीमधऊन प्रिंट जर्नेलिझममध्ये मास्टर्स डिग्री गेतली. त्यानंतर तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून फिल्म मेकिंग आणि स्क्रिप्ट रायटिंगची डिग्री घेतली.एका घटनेमुळे सोमीने २००६ मध्ये गरजू महिलांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. घरगुती हिंसेला सामोरे जाणाऱ्या स्त्रियांसाठी `नो मोर टियर्स` नावाची संस्था स्थापन केली. आज या संस्थेच्या माध्यमातून सोमी अनेक स्त्रियांना मदत करत आहे. सोमीने या संस्थेसाठी पदरचे २ लाख ८६ हजार डॉलर खर्च केले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.