'भूमी'मध्ये संजय दत्त साकारणार वडिलांची भूमिका

निर्माता दिग्दर्शक ओमंग कुमारच्या आगामी 'भूमी' चित्रपटात संजय दत्त वडिलांची भूमिका करणार आहे. वडिल आणि मुलीमधलं भावनिक नातं या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीची अद्याप घोषणा झालेली नाही.

Updated: Nov 20, 2016, 06:27 PM IST
'भूमी'मध्ये संजय दत्त साकारणार वडिलांची भूमिका title=

मुंबई : निर्माता दिग्दर्शक ओमंग कुमारच्या आगामी 'भूमी' चित्रपटात संजय दत्त वडिलांची भूमिका करणार आहे. वडिल आणि मुलीमधलं भावनिक नातं या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीची अद्याप घोषणा झालेली नाही.

फेब्रुवारी महिन्यापासून आग्र्यामध्ये चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होणार आहे. माझ्या व्यक्तीमत्वापेक्षा वेगळ्या अशा भूमिकेच्या शोधात मी होतो, असं संजय दत्त म्हणाला आहे. तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर संजय दत्त भूमी या चित्रपटाबरोबरच विधू विनोद चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद यांच्या चित्रपटामध्येही काम करत आहे. तसंच काही मराठी आणि हिंदी चित्रपटही संजय दत्त प्रॉ़ड्यूस करणार आहे.