मुंबई : रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटाचा फर्स्ट लूक अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवरून शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारनं डॉक्टर रिचर्ड्सची भूमिका साकारली आहे. प्रयोग फसल्यामुळे डॉक्टर रिचर्ड्स कावळा झाल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
2.0 या चित्रपटामध्ये रजनीकांतचा ट्रिपल रोल आहे. यामध्ये डॉ.वसीगरन, चिट्टी आणि एका व्हिलनचा रोल रजनीकांत करत आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारबरोबरच या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि कमल हसन असल्याचंही बोललं जात आहे.
पाहा 2.0 मधला अक्षयचा फर्स्ट लूक
Evil has a new face! #2Point0 #3Diwali2017 #2Point0FLLaunch pic.twitter.com/k33uwU6eg2
— Akshay Kumar (@akshaykumar) November 20, 2016