कोर्टाने उतरवला सलमान खानचा तोरा !

न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्‍यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्‍यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 20, 2013, 11:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्‍यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्‍यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.

बॉलीवूडचा दबंग खान सलमानचा बॉलीवूडमध्ये मोठा दबदबा आहे. पार्टी असो , की एखादा इव्हेन्ट सलमानसाठी रेड कार्पेट अंथरलं जातं. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते पापण्यांची तोरणं बांधून तासन तास त्याच्या घरासमोर उभे असता. सलमान कुठंही गेला तरी त्याला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आणि त्याची जणू त्याला सवयचं झालीय. शुक्रवारी सलमान खान मुंबईच्या वांद्र्यातल्या कोर्टात हिट अँड रन प्रकरणी सुनावणीसाठी आला होता.
यावेळी त्याच्यासोबत त्याच्या दोन बहिणीही होत्या. पण आपण हिट अँड रन प्रकरणात आरोपी आहोत याचा जणू सलमान खानला विसर पडला होता. कोर्ट रुममध्ये वकील,अशिल आणि आरोपी यांच्या बसण्याच्या जागा निश्चीत केलेलेले असतात...पण सलमान खान मात्र अशिलांना बसण्यासाठी असलेल्या जागेवर आपल्या बहिणींसोबत बसला होता. ही न्यायाधिशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सलमानला आरोपी बसतात त्या ठिकाणी बसण्याचा आदेश दिला.

रुपेरी पडद्यावर दबंगिरी करणा-या सलमानला वास्तवाची जाणीव झाली आणि तो आरोपीसाठी असलेल्या जागेवर जाऊन उभा राहिला. सेलिब्रिटि असल्यामुळे सलमानल प्रत्येक ठिकाणी वेगळी ट्रिटमेंट दिली जाते.पण हवेत असलेलं त्याचं विमान कोर्टानं एका क्षणात जमिनीवर आणलं.
हिट अँण्ड रनप्रकरणी आता २४ जुलैला सलमान खानवर आरोप निश्चित होणार आहेत. सलमान काल सेशन कोर्टात हजर झाला. २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सलमानच्या कारनं एकाला चिरडलं होतं तर चौघे गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आलाय. आता सेशन कोर्ट याप्रकरणी काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलंय. सलमान खान जर दोषी ठरला तर त्याला१० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.