'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस

‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2013, 03:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या मानधनाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं बीग बी अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवलीय. आयकर विभागानं केलेल्या विनवणीनंतर सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावलीय.
केबीसीमधून होणाऱ्या मिळकतीबद्दल अमिताभ बच्चन आणि आयकर विभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आयकर विभागानं केलेल्य आरोपानुसार अमिताभ बच्चन यांनी केबीसीमधून होणारी मिळकत चुकीची आणि कमी दाखवलीय. तसंच अमिताभ बच्चन यांनी आपल्या मिळकतीमधला फार थोडा हिस्सा केबीसीमधून तर मोठा हिस्सा एबीसीएल (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड) या कंपनीतून दाखवलाय. यावरच आक्षेप घेत आयकर विभागानं सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतलीय.