`डर्टी` पिक्चरला टिव्हीवर बंदी

पालकानो आता बिनधास्त राहा. कारण यापुढे टिव्हीवर `डर्टी` पिक्चर दिसणार नाही. एकदम भडक आणि `ए` प्रमाणपत्र असणाऱ्या पिक्चरवर बंदी घातली गेली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 25, 2012, 02:34 PM IST

www.24taas.com,मुंबई
पालकानो आता बिनधास्त राहा. कारण यापुढे टिव्हीवर `डर्टी` पिक्चर दिसणार नाही. एकदम भडक आणि `ए` प्रमाणपत्र असणाऱ्या पिक्चरवर बंदी घातली गेली आहे.
`डर्टी पिक्चर` आणि `जन्नत - २` हे चित्रपट टिव्हीवर दाखवावे की दाखवू नयेत यावर चर्चा झडली. `ए` प्रमाणपत्र मिळालेल्या कोणताही सिनेमा कधीही टिव्हीवर दाखवला जाणार नाही, असा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे.
यापूर्वी कोणताही `ए` प्रमाणपत्र सिनेमा टिव्हीवर दाखवण्याआधी त्याला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र पुन्हा घेणे बंधनकारक होते. मात्र आता `ए` प्रमाणपत्र मिळालेला कोणताही सिनेमा टिव्हीवर दाखवण्यासाठी पुन्हा प्रमाणपत्र देण्याचेच बंद केले असून तो सिनेमा कधीही टिव्हीवर दाखवण्यात येणार नाही , असे सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केले आहे . यासाठी १९५२च्या सिनेमॅटोग्राफ अॅक्टचा आधार घेण्यात आला आहे .
आमीर खानचा देहली बेल्ली , अनुराग कश्यप यांचा गँग्स ऑफ वासेपूर ( १ - २ ) आणि विक्रम भट यांचा हेट स्टोरी या चित्रपटांना फटका बसण्याची शक्यताआहे. दरम्यान सेन्सॉर बोर्ड नवा कायदा आणण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे आता यापुढे `डर्टी` पिक्चरला लगाम बसेल. कायदा करण्याचा अधिकार संसदेला असल्याने याचा विचार होणार की नाही, याबाबत शाशंकता आहे.