www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूडमध्ये दरवर्षी बिनकामाचे किमान एक चतुर्थ चित्रपट निघत असतात. मात्र, सिनेमे पाहिले की असं वाटतं, कशाला काढण्यात आले आहेत. हे चित्रपट पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, का तयार केले? हे चित्रपट तयार करण्याची गरज काय होती? असे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आर....राजकुमार’. यामध्ये रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’ करण्यात आली आहे.
कोरियोग्राफर प्रभुदेवा याने वाँटेड या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यांचा दिग्दर्शन असलेला पहिला सिनेमा. त्यावेळी वाँटेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चाला होता. परंतु आता प्रभूदेवाची जादू ही संपली आहे. कारण की, या चित्रपटामध्ये तो काही ही करण्यास यशस्वी झालेला नाही आणि दुसरीकडे शाहीद कपूरचे स्टार हे त्यांच्यावर अजून ही नाराजच आहे. तो त्यांच्यामधून कधी बाहेर येणार हे काही सांगता येत नाही. त्याचा मागेच येऊन गेलेला चित्रपट ‘फटा पोस्टर निकला हीरो’ हा बॉक्स ऑफिसवर काही खास करु शकला नव्हता आणि पडला होता.
सध्या शाहीद प्रत्येक चित्रपटामध्ये फ्लॉप हीरो म्हणून समजला जात आहे. या चित्रपटात एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी खटकते ती म्हणजे रोमान्स आणि कॉमेडीमध्ये का हिंसा होते हेच कळत नाही. या चित्रपटाची कथा अशी आहे की, चित्रपटातमध्ये रोमीयो राजकुमार (शाहीद कपूर) आणि चंदा (सोनाक्षी सिन्हा) यांची प्रेम कथा रंगवली आहे.
राजकुमार हा टपोरी मुलगा दाखवला गेला आहे. मुलींना पटवण्यासाठी तो छपरीगिरी करतो. राजकुमार हा सर्वप्रकारचे काळेधंदे देखील करतो आणि तो डॉनच्या बरोबर काम ही करतो. डॉन हा राजकुमारच्या प्रेयसीबरोबर प्रेम करायला लागतो आणि त्यामुळे प्रेमाचे रुपातर हे भांडणात होते. त्यावेळी खूप गोंधळ , आवाज दाखविण्यात आलाय. याचा कशाशीही ताळमेळ लागत नसल्यामुळे या चित्रपटात प्रेमाचे आणि हास्याचे सर्व रंग हे गायब झालेले दिसतात.
प्रभूदेवाने शाहीद कपूरला अॅक्शन हीरोच्या रुपात पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. भोळ्या चेहेऱ्याच्या शाहीदला खोटी दाढी चिकटवून गुंडच्या रुपात उभे केले आहे. अॅक्शन बरोबरच नृत्याचा तडका ही आहे. चित्रपटात प्रेम कमी आणि मारामारीच जास्त दिसून येते. चित्रपटाची कथा आणि चित्रपटातून दिग्दर्शकाला काय सांगायच आहे हे शेवट पर्यंत एक कोड आहे. त्यामुळे चित्रपटात फक्त गोंधळच दिसून येतो.
चित्रपटामध्ये हीरो हा सारखा शांत आणि रागीट दाखवला आहे. पण त्यांच्यामध्ये कोणताही नवीनपणा दिसून येत नाही. या चित्रपटात अनेक चूका असूनही शाहीद कपूर आणि सोनाक्षी यांनी त्यांच्या स्वत:च्या भूमिकेला परिपूर्ण न्याय दिला आहे. चित्रपटातील गाणे ऐकण्यासाठी ठिक आहे. त्यामुळे ते चित्रपट प्रदर्शत होण्याच्या अधिच तरुणाईच्या तोडावर येताना दिसतात. शाहीद आणि सोनाक्षी यांच्यामधला रोमांस हा चित्रपटातील राडा विसरायला लावणारा आहे. एकूण म्हणजे चित्रपट हा बघण्याच्या लाईकीचा नाही. पण तुम्ही शाहीद आणि सोनाक्षीचे चाहाते असाल तर हा चित्रपट एक वेळा नक्की बघू शकता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.