www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्यावर नेहमी महिलांचा अपमान करतो, असा आरोप होत आहे. मात्र, मी रॅप गाण्यातून महिलांचा अपमान करीत नाही, असे स्पष्टीकरण जगप्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग याने दिले आहे.
माझ्या गाण्यांमध्ये महिलांचा अपमान होईल, असे काही नाही आणि कोणी ही माझ्या मुलीला प्रभावित करण्यासाठी माझे गाणे म्हटले तरी मला काही फरक पडणार नाही, असे धक्कादायक विधान हनी सिंगने केले आहे. २३ वर्षीय हनी सिंग सांगतो, लोकांना महिलांवर आधारित गाणी जास्त आवडतात आणि त्यामुळे माझी गाणी जास्तकरुन महिलांवर आधारित असतात.
माझ्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. मला मूल नाही पण भविष्यात मला मुलगी झाली आणि तिला प्रभावित करण्यासाठी कोणी माझे प्रसिद्ध गाणे म्हणत असेल तर माझी काहीही हरकत नाही. मी फक्त मुलींवरच गाणे तयार करतो ही जनतेची समज चुकीची आहे. मी भगत सिंगवर देखील गाणे गायले आहे. परंतु ते कोणालाही माहिती नाही. तसेच मी पुरुषांवरुन देखील गाणे काढले आहे. परंतु ते गाणे प्रसिद्ध झाले नाही.
हनी सिंगचा संगीत प्रवास हा पंजाबमधून सुरू झाला आहे. संगीत दिग्दर्शन करिअरची सुरुवात पंजाबमध्ये केली आणि आता तो बॉलिवूडमध्ये पाय रोवतो आहे. बॉलिवूडच्या गाण्यामध्ये रस नाही. मात्र आपल्या आवडत्या अभिनेत्यांसाठी तो गातो. बरं का तो ही गाणी फुकटात गातो. सध्या हनी सिंग ‘कोलावरी डी’ चे निर्माते अनिरुद्ध रवीचंद्र बरोबर पहिल्यांदाच तमिळ गाण्यासाठी तयारी करीत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.