जेव्हा अंबानींच्या घरी सचिन तेंडुलकरची फौज धडकते...
चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबई इंडियन्सच्य़ा टीमच्या सन्मानार्थ आज टीमचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी पार्टी देण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह टीमचे सारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यावेळी उपस्थित होता.
मुंबई इंडियन्स फायनलला; सचिनच्या ५० हजार धावा पूर्ण
काल दिल्लीत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्रिनिदाद टोबॅगो संघावर सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला.
निवृत्तीचं गुपित सचिन आणि अंजलीलाच ठाऊक
सचिन तेंडुलकरला २००वी कसोटी खेळून बीसीसीआय निवृत्ती स्वीकारयाला सांगणार असे वृत्त होते. परंतु, सचिनच्या निकटच्या सुत्रांनूसार निवृत्तीचा निर्णय अशाप्रकारे घेतला जाणार नाही.
सचिन, दीपिका, करीनाला गोव्याचा नकार
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनेत्री दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि सैफ अली खान यांसारखे लोकप्रिय सेलिब्रिटी गोवा राज्याचे ब्रँड अँबेसिडर बनण्यासाठी रांगेत असताना या सर्वांना गोव्याने चक्क नकार दिला आहे.
२०० टेस्ट मॅच खेळून `क्रिकेटचा देव` निवृत्त होणार?
भारताचा महान बॅटसमन आपल्या टेस्ट करिअरच्या २०० वी टेस्ट लवकरच खेळणार आहे. पण, हीच मॅच त्याची शेवटची टेस्ट असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
पेस, तेंडुलकर आणि आनंद... एक धागा!
लिअँडर पेसनं वयाच्या ४० वर्षी अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. वयाची ४० गाठूनही त्यानं जिद्द असल्यावर आपण अशक्यप्राय गोष्ट शक्य करु शकतो हेच दाखवून दिलं. पेस प्रमाणेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंद यांनीही हेच दाखवून दिलं आहे. पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट...
मी क्रिकेट चाहत्यांना निराश करणार नाही- सचिन
मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या निवृत्तीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा विराम लावलाय. ‘मला नाही वाटत याबाबत मला काही विचार करण्याची गरज आहे’ याशब्दात सचिन तेंडुलकरनं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं.
सचिनची लँडमार्क २००वी टेस्ट मॅच होमपीचवर!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली करिअसचं ऐतिहासिक २००वी टेस्ट मॅच आपल्या होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. बीसीसीआयच्या कोलकाता इथं झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौऱ्यावर येत आहे.
सचिन भारत`रत्न` - सौरभ गांगुली
सचिन तेंडुलकर आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवृत्ती घेईल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत सचिनचा जूना सहकारी म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला विचारले असता त्याने अगदी वेगळे उत्तर दिले.
सचिनच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला - गांगुली
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सौरव गांगुलीनं मास्टर ब्लास्टर सचिनच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. खेळाडूंच्या निवडीबाबत सचिननं केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं सौरव गांगुलीचं म्हणणं आहे.
‘टी-२०’मुळं क्रिकेट अधिक रोमांचक – सचिन
क्रिकेटमध्ये ‘टी-२०’चा समावेश करण्यात आल्यानं, क्रिकेट आणखी रोमांचक झाल्याचं, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं म्हटलंय. बंगळुरूमध्ये बोलत होता.
सचिनची पहिली टेस्ट सेंच्युरी झाली २३ वर्षांची!
एखाद्या क्रिकेटरला स्वप्नवत वाटावं असं मास्टर ब्लास्टरचं करियर... १४ ऑगस्ट १९९०ला ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अवघ्या १७ वर्षाच्या सचिन रमेश तेंडुलकरनं दमदार खेळी खेळत टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी लगावली आणि पराभवाच्या काठावर असलेल्या मॅचला अनिर्णित अवस्थेत आणलं. याच सचिनच्या टेस्ट मॅचमधल्या पहिल्या सेंच्युरीला आज २३ वर्ष पूर्ण झालीयेत.
महिला अधिकारांसाठी सचिन गाणार कविता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. महिला अधिकारासाठी सचिनची लोकप्रियता वापरण्यात येत आहे. सचिनने एक मराठीत कविला गायली आहे. अभिनेता फरहान अख्तरच्या ‘मर्द’ या मोहिमेसाठी ही कविता सादर करण्यात आली आहे.
‘भारतरत्न’साठी ध्यानचंद यांची शिफारस
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली.
विराटचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर
क्रिकेटमधील आपल्या धडाकेबाज परफॉर्मन्समुळे भारतीय टीमचा सुपरहिरो अशी सध्या विराटची ओळख आहे...मात्र या सुपरहिरोचाही एक सुपरहीरो आहे...
पॉण्टिंग तोंडावर पडला... सचिनच सरस
सचिनच्या तुलनेत लाराने आपल्या संघाला जास्त सामने जिंकून दिले, असे अकलेचे तारे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंगने तोडले आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आपल्या संघाला सामने जिंकून देण्याच्या स्पर्धेत सचिन लाराच्या बराच पुढे आहे.
सचिनपेक्षा लाराच सरस - रिकी पॉंटिंग
वेस्ट इंडिजचा आघाडीचा खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा खेळायला येणार असेल तर मला झोपच लागत नसे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा लाराच महान खेळाडू आहे, असे मत रिकी पॉंटिंग यांने व्यक्त केलं आहे. सचिनपेक्षा लाराच टीमसाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे, असे रिकी म्हणतो.
सचिन तेंडुलकरला दाखविला बाहेरचा रस्ता!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जादू चालेनाशी झाल्याने वायुदलाच्या ब्रॅण्ड ऍम्बेसिडरपदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आलेय. त्यामुळे सचिनचे वायुदलातील विमान लॅंड करावे लागले आहे.
`तेंडुलकर` असतानाच त्याने थांबावेः गांगुली
सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर’ म्हणूनच निवृत्त व्हावे. फॉमशी झगडणारा क्रिकेटपटू म्हणून नव्हे, असे रोखठोक मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मांडले आहे.
सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन - ब्रायन लारा
सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन आहे, असं मतं वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केलंय. भारतीय खेळांडूपैकी सौरव गांगुली हा माझा आवडता खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची सौरवची कर्णधारपदाची कामगिरी मला प्रेरणादाई आहे, असे तो म्हणाला.