www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन आहे, असं मतं वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केलंय. भारतीय खेळांडूपैकी सौरव गांगुली हा माझा आवडता खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची सौरवची कर्णधारपदाची कामगिरी मला प्रेरणादाई आहे, असे तो म्हणाला.
सौरव हा माझा आवडता भारतीय कॅप्टन आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने कर्णधारपदाची कामगिरी केली होती ती अप्रतिम होती. असे व्यक्तव्य ब्रायन लारा ने गुरुवारी आयोजित केलेल्या एका समारंभात म्हटले. त्याचप्रमाणे कपिल देव आणि सचिन तेंडुलकर हे ही चांगले कॅप्टन आहेत असेही त्याने म्हटले.
१९८३ मध्ये वेस्ट इंडीज खूप चांगली खेळली होती आणि मला वाटल होतं की फायनलमध्ये पोहोचू मात्र मी त्यावेळेला बाहेर खेळण्यास गेलो होतो आणि आल्यावर मला समजले की भारत वर्ल्डकप जिंकला होता. कपिल देव हे त्यावेळी कॅप्टन होते. असं लारा म्हणाला.
सचिन तेंडुलकरचेही त्याने कौतुक केले यावेळी तो असं म्हणाला की सचिन तेंडुलकर हा माझा मित्र आहे. त्याचे भारत आणि विश्वातील क्रिकेटचे योगदान खूप मोठे आहे. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्याबद्दलही त्याने मत व्य्क्त केले. लारा असं म्हणाला की, धोनी हा उत्तम कॅप्टन आहे. त्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो प्रत्येकाचं ऐकून घेतो.तो नेहमी आपल्या सहका-यांचीही मतेही विचारात घेतो.
याबरोबरच त्याने स्वत:चेही अनुभव शेअर केलेत.
तो म्हणतो की माझी सर्वात पहिली बॅट म्हणजे एका नारळाच्याझाडाची फांदी. त्यानंतर माझी वेस्ट इंडीजच्या टीममध्ये खेळायची इच्छा होती.मी सुरूवातीला असाच क्रिकेट खेळत असे. आणि गोर्डन ग्रीनिज, डेसमंड हैंस, विवियन रिचर्डस याच्यांबरोबर खेळण्याची कल्पना मी करत असे.
यावेळी त्याने आपल्या वडिलांचेही कौतुक केले. अंडर १४, अंडर १६ मध्ये जेवढ्या काही मॅचेस लारा खेळला प्रत्येकवेळी त्याचे वडील त्याच्यासोबत होते मात्र जेव्हा त्याने वेस्ट इंडीजच्या टीममध्ये खेळण्यास सुरूवात केली त्यावेळी त्याचे वडील मात्र या जगात नव्हते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.