विराटचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर

क्रिकेटमधील आपल्या धडाकेबाज परफॉर्मन्समुळे भारतीय टीमचा सुपरहिरो अशी सध्या विराटची ओळख आहे...मात्र या सुपरहिरोचाही एक सुपरहीरो आहे...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 21, 2013, 07:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटमधील आपल्या धडाकेबाज परफॉर्मन्समुळे भारतीय टीमचा सुपरहिरो अशी सध्या विराटची ओळख आहे...मात्र या सुपरहिरोचाही एक सुपरहीरो आहे...एक असा खेळाडू ज्याला मैदानावर खेळताना पाहिल्यानंतर विराटने बॅट पकडण्याचा निर्णय घेतला... आणि तेव्हापासून आतापर्यंत तोच खेळाडू, विराटचा सुपरहिरो आहे...
केवळ आपल्या 5 वर्षांच्या छोट्याशा करिअरमध्ये आपल्या आक्रमक खेळामुळे टीम इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ बनलेल्या विराटचं अख्ख क्रिकेटविश्व फॅन झालं आहे... टीम कोणतीही असो... कुठलंही मैदान असो... केवळ एवढंच नाही तर क्रिकेटचा कोणत्याही फॉर्म्याट असो... कोहलीची धडाकेबाज स्टाईल कधीच बदलली नाही... त्याची बॅट एकदा का तळपायला लागली की प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडालीच म्हणून समजा.... सत्य मात्र हे आहे की सचिन तेंडुलकर नसता तर टीम इंडियात विराट कोहलीची कधीच मोठा क्रिकेटर म्हणून ओळख झाली नसती... त्याला कारणंही तसंच आहे... कारण सचिनचा खेळ पाहूनच विराट क्रिकेट खेळायला शिकला... सचिनची बॅटिंग स्टाईल आणि त्याचं टेंपरामेंट यातूनच शिकवण घेत विराटने क्रिकेटमध्ये उत्तरोत्तर प्रगती केली... आणि त्यामुळेच आज विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्व सुपरहिरो म्हणून ओळखतं...
मास्टर ब्लास्टर सचिनसारखाच कधीही हार न मानण्याच्या इराद्याने खेळणा-या विराटने... अनेकदा टीम इंडियाला पराभवाच्या मार्गावरून परत आणताना विजयी केलं... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स अथवा सर्वाधिक सेंच्युरीजच्या रेसची चर्चा होते... तेव्हा सचिनने एव्हरेस्टएवढ्या रचलेल्या रेकॉर्डसना आव्हान देण्याची कुवत केवळ विराटमध्येच आहे यांवर सर्वांचंच एकमत होतानाचं चित्र दिसतं... आणि यांबाबत स्वत: सचिनलाही विराटवरच अधिक विश्वास वाटतो...
सध्या क्रिकेटविश्वात विराटचीच चलती असल्याने त्याची 15 वर्ष जुन्या सचिनशीही तुलना केली जाऊ लागली आहे... आज टेस्टपासून टी-20पर्यंत प्रत्येक क्रिकेट फॉर्म्याटमध्ये तो टीम इंडियाची गरज बनला आहे... मार्केटमध्येही सध्या विराट कोहली या ब्रँडचीच चर्चा आहे... केवळ एवढंच नाही तर भविष्यातील टीम इंडियाचा कॅप्टन म्हणूनही अनेकांच्या नजरा त्याच्याकडे रोखल्या गेल्या आहेत... आज कोहली संपूर्णपणे आपला सुपरहिरो सचिन तेंडुलकरच्या पावलांवर पाऊल ठेवताना दिसत आहे... त्यामुळे भविष्यात टीम इंडियाच्या या सुपरहिरोने यशाच्या वारूवर स्वार होत विक्रमांचे नवे एव्हरेस्ट उभारल्यास नवल वाटायला नको...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.