'पद्मावती'चा वाद काय आहे जाणून घ्या...

बाजीराव मस्तानी फिल्मनंतर आता संजय लीला भन्साळी पद्मावती फिल्मच्या तयारीला लागलेत. मात्र याच सिनेमावरून भन्साळी राजपूत समाजाच्या टीकेचे धनी बनलेत. भन्साळींवर थेट हल्ला करण्यात आला. काय आहे हा वाद पाहूया...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2017, 06:51 PM IST
'पद्मावती'चा वाद काय आहे जाणून घ्या... title=

मुंबई : बाजीराव मस्तानी फिल्मनंतर आता संजय लीला भन्साळी पद्मावती फिल्मच्या तयारीला लागलेत. मात्र याच सिनेमावरून भन्साळी राजपूत समाजाच्या टीकेचे धनी बनलेत. भन्साळींवर थेट हल्ला करण्यात आला. काय आहे हा वाद पाहूया...

राजस्थानमधील एका कथेवर आधारीत संजय लीला भन्साळी पद्मावती सिनेमा करत आहेत. राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिलजी यांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा असल्याचं सांगण्यात येतंय. पद्मावती आणि खिलजीवर काही दृश्य जयपूरमधील एका सेटवर चित्रित करण्यात येत होती. मात्र याचवेळी कर्नी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुफान हल्ला चढवत संजय लीला भन्साळींवर हल्लाबोल केला. यात भन्साळी बालबाल बचावलेत. राणी पद्मावतीच्या जीवनावर असलेल्या या सिनेमात भन्साळी इतिहासाची छेडछाड करत वेगळीच कहानी पडद्यावर मांडत असल्याचा आरोप राजपूत समाजाने केलाय. 

सुरुवातीला याबाबत भन्साळींना इशारेही देण्यात आले होते. मात्र भन्साळींनी त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नव्हतं. कदाचीत बाजीराव मस्तानीच्या वेळी जसा वाद सुरू झाला आणि जसा संपला त्याचीच पुनरावृत्ती इथे होईल असा भन्साळींचा अंदाज होता. मात्र राजपूत समाजाच्या रोषापुढे भन्साळींवर भलतंच संकट ओढवलं. 

भन्साळींवर सेटवर थेट हल्ला करण्यात आला. राणी पद्मावती चित्तोडची एक स्वाभिमानी राणी होती. सौदर्याची खाण असलेल्या पद्मावतीच्या शौर्याची आणि बलिदानाची कथा इतिहासात अमर आहे. मात्र भन्साळी सिनेमातून काही वेगळीच कथा मांडत असल्याचा आरोप कर्नी सेनेने केलाय 

कर्णी सेनेच्या आक्रमकतेपुढे निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी अखेर माघार घेतलीये. राणी पद्मावती आणि खिलजीमध्ये कोणत्याही प्रकारचे रोमॅण्टिक सीन नसतील, अशी ग्वाही कर्नी सेनेच्या नेत्यांना संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसने दिलीये. भन्साळी प्रॉडक्शनच्या सीईओ शोभा संत यांनी फिल्ममध्ये राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिलजी यांच्यात कोणत्याही प्रकारचे रोमॅण्टिक सीन नसतील असं स्पष्ट केलंय. 

या पत्रकार परिषदेत राजपूत समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधीही हजर होते. ज्या कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जयपूरमध्ये सेटवर जाऊन भन्साळींवर हल्ला केला होता, त्या कर्णी सेनेचे नेते महिपाल सिंह मकराना हेही यावेळी उपस्थित होते. आमची जी मागणी होती, ती मान्य करण्यात आल्याचं महिपाल यांनी म्हटलंय. 

राजस्थानमधील प्रसिद्ध राणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित ही फिल्म आहे. राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण आहे. भन्साळींनी राणी पद्मावतींवर सिनेमा करताना या ऐतिहासिक कथेत फेरफार केल्याचा आरोप कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता.