मुंबई : जर तुम्ही खाली दिलेल्या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येणार नाही.
१. लक्ष्मीचं चित्र : लक्ष्मी मातेचा फोटो नेहमी खिशात ठेवल्यास बरकता बनून राहते. अशी मान्यता आहे. लक्ष्मी मातेचा फोटो फाटणार नाही याची काळजी घ्या. फाटला तर त्याला नदीत प्रवाहित करा.
२. पिंपळाचं पान : पिंपळाचं अभिमंत्रीत पान जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा. धर्मग्रंथानुसार पिंपळाच्या पानामध्ये भगवान विष्णूचा वास असतो. पिंपळाच्या पानाला अभिमंत्रीत करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पान झाडावरून तोडून गंगाजलने पवित्र करुन घ्या. त्यानंतर त्याच्यावर केसरने श्री लिहा. त्यानंतर ते पान पर्समध्ये अशा प्रकारे ठेवा की ते कोणालाही दिसणार नाही.
३. गुरूचा फोटो : तुमच्या गुरूचा फोटो तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पाडतो. त्यामुळे गुरूचा फोटो नेहमी पाकिटात ठेवा.
४. तांदूळ : ज्योतिष शास्त्रानुसार तांदूळ हा शुक्र ग्रहाशी संबंधित धान्य आहे. जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी शुक्र ग्रहाला अधिक महत्त्व आहे. पुजेदरम्यानही लक्ष्मी मातेला तांदूळ चढवू शकता. तांदूळ तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता.
५. चांदीचं नाणं : लक्ष्मी मातेचं चांदीचं नाणं हे प्रिय मानलं जातं. चांदीची कोणतीही वस्तू लक्ष्मी मातेच्या चरणस्पर्शानंतर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवू शकता.
६. कमळाच्या बिया : कमळाच्या बिया पाकिटात ठेवणं शुभ मानलं जातं. पाकिटात इतर कोणत्याही नकारात्मक आणि महत्त्वाची नसलेली वस्तू ठेवू नये.