स्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस

जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल. 

Updated: Sep 15, 2015, 01:53 PM IST
स्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस title=

मुंबई: जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल. 

कारण यंदा गुरूवारी स्वाती नक्षत्रात येणाऱ्या गणेश चतुर्थीला धन-संपत्तीच्या बाबतीत खूप विशेष मानलं जाणार आहे. स्वाती नक्षत्रात गणपती बाप्पाच्या पूजेनं घरात लक्ष्मी येईल, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील. स्वाती नक्षत्राची गणेश चतुर्थी लक्ष्मी कारक योग बनवते.

अधिक वाचा - देवघरात किती देव असावेत?

गुरुवारचा दिवस ज्ञान आणि बुद्धीसाठी विशेष आहे. १७ सप्टेंबरला गुरूवार पण आहे म्हणून गणपती बाप्पा विद्यार्थ्यांना नक्की देईल.

बाप्पाच्या स्थापनेसाठी उत्तम मुहूर्त

धन-संपत्ती आणि विद्या-बुद्धी मिळविण्यासाठी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना शुभ मुहूर्तावर करा. यावेळी चतुर्थी तिथी १६ सप्टेंबरला रात्री ०८.०१ पासून १७ सप्टेंबर २०१५ ला रात्री १०.२० पर्यंत आहे.

या वेळेदरम्यान कधीही घराघरात बाप्पाची स्थापना करू शकता. पण १७ सप्टेंबरला सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ पर्यंत बाप्पाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आहे. 

अधिक वाचा - पृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.