www.24taas.com
घरातील बेडरूम हे दिवसभराच्या दगदगीनंतरचे विश्रांतीस्थान असते. तर लहानांसाठी ही रूम म्हणजे उर्जेचा स्त्रोत असते. त्यामुळेच ही बेडरूम पश्चिमेला तोंड करून असेल तर अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे किरण मोठ्यांना रिलॅक्स करतात. याऊलट बेडरूमचे तोंड पूर्वेला असल्यास लहानग्यांना उगवणाऱ्या सूर्याची उर्जा मिळते.
खिडकीच्या दिशेने बेड असल्यास त्यामुळे ही प्रतिकूल ऊर्जा आकर्षित होते. बागवा आरशामुळे त्याला काही प्रमाणात प्रतिबंध करता येतो. पण दरवाजाच्या दिशेने बेड ठेवणे कटाक्षाने टाळावे.
बेडरूम शांत असावी. त्यातील दिवेही मंद असावेत. भिंतींचे रंगही भडक नसावेत. तेही डोळ्यांना शांतावणारे असावेत. दोनपेक्षा जास्त आरसे आणि भडक रंग `ची` ला उद्युक्त करतात. त्यामुळे ते टाळावे.
बेडच्या पायाशी आरसा नको. तसेच तो खिडकीच्या दिशेनेही नको. फेंगशुईच्या मते दिवाणखान्याच्या शेजारी बेडरूम असावी. बेडरूम हे पावित्र्य, नव्या संधी आणि प्रगतीची निदर्शक आहे. फेंगशुईमध्ये बेडरूमधील दारे, आरसे आणि बेड यांची योजना कशी केली आहे, याला महत्त्व आहे. बेडरूमचे दार उजव्या बाजूला पूर्णपणे उघडत असल्यास नव्या भरपूर संधींना आत येण्याची जागा आहे.