www.24taas.com, औरंगाबाद
मनसेवर आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप करणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधवांवर मनसेनं पलटवार केला आहे. कन्नडच्या उपसभापती निवडीसाठी उमेदवाराकडून दहा लाख रुपये मागितल्याचा सनसनाटी आरोप मनसेनं केला आहे. कन्नड पंचायत समितीचे गौतम शिरसाट यांच्याकडं उपसभापती करण्यासाठी १० लाखांची मागणी केली होती.
त्यानुसार शिरसाट य़ांची पक्षाकडं शिफारस करण्यात आली. शिरसाट उपसभापती झाल्यानंतर त्यांनी हर्षवर्धन जाधवांना पैसे दिले नाहीत. त्यामुळं शिरसाट यांना हटवण्यासाठी जाधव यांनी मोहिम सुरु केली असा आरोप केला आहे.
मनसे मात्र शिरसाट यांना उपसभापतीपदावर कायम ठेवण्यावर ठाम राहिली. याच रागातून जाधवांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याचा दावा मनसेनं केला आहे. तसेचे राजीनामा हे फक्त एक प्रकारचं नाटक होतं, एवढा मोठा निर्णय घेताना विचार केला नाही का दुष्काळाचा? असा सवालही मनसेने केला आहे.