www.24taas.com, लंडन
तुम्ही झोप घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल किंवा रात्री उशिरा जागरण करत असाल तर ते तुमची कायमची झोप उडवणारे ठरेल. पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला रोगाने पछाडले समजा. तुम्ही हृदविकाराबरोबर मधुमेहाचे शिकारी व्हाल. त्यामुळे ही दुखणं जीव घेणं ठरू शकेल. त्यामुळे झोपेबाबत खबरदारी घेतली पाहिजे.
झोपेबाबत आपल्याला काही समस्या असतील तर तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घेणं जरूरीचं आहे. लंडनमधील एंपिरिल कॉलेजने झोपेबाबत संशोधन केलं आहे. झोप नीट घेतली नाही किंवा मिळाली नाही तर तुम्हाला हृदविकार आणि मधुमेह होऊ शकतो.
सातत्याने तीन दिवस झोप न घेतल्यास आजारात वाढ होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे झोप शरिराला आवश्यक आहे. तीन दिवस सातत्याने झोप व्यवस्थित न झाल्यास मधुमेहाची लक्षणे वाढीला लागतात आणि तुम्हा मधुमेहाचे बळी होता. झोप न मिळाल्याने दोषपूर्ण प्रोटीनची वाढ होते. ज्यामुळे २४ तास तु्म्हाला हे चक्र त्रासदायक ठरते. त्यामुळे इंसुलिनात वाढ होऊन रोगाळा बळकटी मिळते.
'डेलीमेल'ने संशोधन करणाऱ्या प्रा. फिलिपे फ्रोगेल यांचा हवाला देऊन सांगितले आहे की, या रोगांपासून सुटका करण्यासाठी व्यक्तीच्या आचरणात बदल होणे आवश्यक आहे. तसेत काही बदल घडविण्यासाठी एक सूची करावी लागेल. त्यातून व्यक्तीच्या आचरणात बदल घडवून आणावा लागेल. मात्र, याबाबत अनेकांनी नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि होणाऱ्या संभाव्य आजारापासून स्वत:ची सुटका करू घ्या, हेच सांगणे आहे.