www.24taas.com, नागपूर
संगणकावरील काम किंवा बैठे काम करण्याची पद्धत अनेक आजारांसोबत, अमली पदार्थांचे वाढते सेवन लोकांना नपुंसक बनविण्याच्या मार्गावर घेऊन जात आहे. ही समस्या आणखीच गंभीर होत आहे. यौन समस्यांशी जुळलेल्या विशेषज्ञानुसार पुरुष नपुंसकतेत दरवर्षी वाढ होत आहे. यावर अभ्यास करणार्या तज्ज्ञांच्या मतानुसार अशीच जीवनशैली राहिल्यास नपुंसकतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेषज्ञ डॉ. संजय देशपांडे यांनी सांगितले, प्रत्येक व्यक्तीमधील शुक्राणूंच्या संख्येत घट होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार पाच दशकांपूर्वी प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले होते. त्यावेळी १२० मिलियन शुक्राणूच्या संख्येला सामान्य मानले जात होते.
नंतरही ही संख्या कमी होऊन क्रमश: ६० मिलियन, ४० मिलियन, २० मिलियनपर्यंत आली आहे. आता एका तंदुरुस्त पुरुषाच्या शरीरात १५ ते २० मिलियन शुक्राणू सामान्य मानले जात आहे. परंतु आता याहीपेक्षा कमी शुक्राणूंची संख्या असलेल्या व्यक्तीसमोर येत आहे.