लक्ष्मणची धास्ती ऑस्ट्रेलियनं टीमला

ऑस्ट्रेलियनं टीमला सर्वाधिक धास्ती आहे ती लक्ष्मणची. भारताच्या या स्टायलीश बॅट्समनने हैराण करून सोडलंय.

Updated: Dec 15, 2011, 08:04 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

ऑस्ट्रेलियनं टीमला सर्वाधिक धास्ती आहे ती लक्ष्मणची. भारताच्या या स्टायलीश बॅट्समनने हैराण करून सोडलंय. गेल्या दहा वर्षांत ऑस्ट्रेलियाचे चार कॅप्टन्सनी लक्ष्मणच्या तडाख्यापुढे शऱणागती पत्कारली.

 

महत्वाचं म्हणजे क्रिकेटविश्वावर कांगारुंचे वर्चस्व असताना लक्ष्मणनं कांगारुंना पुरून उरलाय.  लक्ष्मणने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ११ टेस्ट मॅचेसमध्ये १०८१ रन्स काढलेय. त्यानं ५४ सरासरीनं रन्स काढताना ४ सेंच्युरीही झळकावल्यात.

 

लक्ष्मणनं तीन सेंच्युरी सिडिनीच्या मैदानात झळकावलेत तेही सलग तीन दौ-यांमध्ये. म्हणजे लक्ष्णनं या दौ-यातही सेंच्युरी झळकावली तो सिडनीत सलग चौथी सेंच्युरी ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. लक्ष्मणच्या सेंच्युरीची सफर सुरु झाली ती २०००मध्ये. तेव्हा लक्ष्मणने सिडनीत १६७ रन्सची अविस्मणीय खेळी केली होती. त्यानंतर तीन वर्षानंतर  २००३ मध्ये एडीलेडमध्ये  १४८  रन्सची खेळी करताना राहुल द्रविडसोबत महत्वूपर्ण पार्टनरशिप करताना भारताला विजय मिळवून दिला होता.

 

याच दौ-यात लक्ष्णन सिडनीत १७८  रन्सची लाजवाब खेळी केली.तर २००७  मध्ये लक्ष्मणनं सिडनीतच १०९ रन्सची व्हेरी व्हेरी स्पेशल खेळी केली. गेल्या दौ-या लक्ष्मणचा परफॉमन्स फारसा चांगला झाला नव्हता. मात्र आता टीम इंडिया पूर्ण बहरात आहे. त्यामुळे लक्ष्मणची बॅट पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात तळपली तर भारताचा ऐतिहासिक विजय निश्चित.