झी २४ तास वेब टीम
सरत्या वर्षात क्रिकेट विश्वात काही क्रिकेटपटूंनी रेकॉर्ड रचले तर. मास्टर-ब्लास्टरने टेस्टमध्ये १५ हजार रन्स आपल्या नावे केल्या. तर भारताकडून द्रविड टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणारा क्रिकेटपटू ठरला. तर वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा एखाद्या दु:स्वप्नासारखा ठरला. तर स्पॉट फिक्सिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना तर आपल्या या गैरकृत्यासाठी गजाआड जाव लागलं. हे सार काही पाहुयात REVIEW २०११मध्ये.
१. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सरत्या वर्षात क्रिकेटप्रेमींना काही आनंदाचे क्षण अनुभवयाला दिले. २०११ मध्ये सचिनने टेस्टमध्ये १५ हजार रन्सचा टप्पा ओलांडला. टेस्टमध्ये सर्वाधिक १५ हजारांहून अधिक रन्स करणारा सचिन जगातिल पहिला क्रिकेटपटू ठरलाय. दिल्लीतील फिरोजशाह कोटला ग्राऊंडवर वेस्टइंडिविरूद्धच्या झालेल्या पहिल्याच टेस्टमध्ये सचिनने टेस्टमध्ये १५ हजार रन्सचा टप्पा ओलांडून हा इतिहास रचला.
२. 'द वॉल' या आपल्या बिरूदावलीला शोभेल अशी कामगिरी सरत्या वर्षात राहुल द्रविडने याने केलीय. २०११ मध्ये त्याने टेस्टमध्ये सर्वाधिक १ हजारांहून अधिक रन्स केल्या आहेत. द्रविडने या रन्स १२ टेस्टमध्ये केल्या आहेत. यामध्ये ५ सेंच्युरी आणि ४ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर नॉट आऊट १४६ रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याशिवाय द्रविडने टेस्टमध्ये १३ हजार रन्सचा टप्पादेखील पार केला. सचिननंतर अशी कामगिरी करणारा द्रविड दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. महत्त्वाच म्हणजे द्रविडने यावर्षी वन-डे क्रिकेटमधून रिटार्डमेंट जाहीर केली.
३. टीम इंडियाने वर्षाच्या सुरूवातीलाच दक्षिण आफ्रिकेविरूद्धची अखेरची टेस्ट ड्रॉ करत तीन टेस्टची सीरीज बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. मात्र, वन-डे सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने बाजी मारली. यानंतर वर्ल्ड कपच ऐतिहासिक विजेतेपद पटकावल्यानंतर विंडिज दौ-यावर गेलेल्या टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने ३ टेस्टची सीरिज १-० ने तर ३-२ ने वन-डे सीरिजवर कब्जा केला... यानंतर इंग्लंड दौ-यावर टीम इंडियाची मात्र चांगलीच नाचक्की झाली. इंग्लने टीम इंडियाला टेस्ट सीरिजमध्ये ४-० ने क्लीन स्वीप दिला आणि वन-डेमध्येही ३-० ने पराभूत केल. मात्र या पराभवाचा बदला टीम इंडियाने इंग्लड टीम भारतात आल्यावर वनडे सीरीज ५-० ने क्लीन स्वीप करून घेतला. तर वर्षाच्या अखेरीस भारतात आलेल्या विंडिज टीमला टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये २-० ने तर वन-डे सीरिजमध्ये ४-१ ने पराभूत केल.
४ . २०११ मध्येचं क्रिकेटला बट्टा लावणा-या पाकिस्तानी फिक्सर्सला शिक्षा ठोठावण्यात आली. क्रिकेटमध्ये प्रथमच फिक्सिंग प्रकरणी तुरूंगाची हवा खावी लागली..इंग्लंडविरूद्धच्या लॉर्ड्स टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाकिस्तानचे सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर हे तीन क्रिकेटपटू दोषी आढळले आणि त्यांना तुरूंगावाची शिक्षाही झाली. हे क्रिकेटपटू लंडनस्थित सट्टेबाज मजहर माजिदशी स्पॉट फिक्सिंग करत असल्याचे २०१० मध्ये स्टिंग ऑपरेशननं इंग्लंडच्या एका वृत्तपत्राने केले होते.