चेन्नई सुपर किंग्ज 'कमबॅक' करेल का?

चेन्नई सुपकिंग्जला आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सकडून सपाटून मार खावा लागला होता. त्यांचा मुकाबला आता अंडरडॉग्ज असलेल्या डेक्कन चार्जर्सशी होणार आहे. दुखापतीमुळे डेक्कनच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे तर चेन्नईची टीमही फॉर्ममध्ये परत येण्यासाठी झगडणार आहे.

Updated: Apr 7, 2012, 12:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

चेन्नई सुपकिंग्जला आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सकडून सपाटून मार खावा लागला होता. त्यांचा मुकाबला आता अंडरडॉग्ज असलेल्या डेक्कन चार्जर्सशी होणार आहे. दुखापतीमुळे डेक्कनच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे तर चेन्नईची टीमही फॉर्ममध्ये परत येण्यासाठी झगडणार आहे. महेंद्रसिंग धोनीची हाय प्रोफाईल चेन्नई टीम आणि कॅमरून व्हाईटची स्टारडम नसलेल्या डेक्कन चार्जर्समध्ये लढत होणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन्स चेन्नई  सुपर किंग्जला पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी त्यांची टीम आतूर असणार आहे.

 

डेक्कनच्या टीमला दुखापतींचा आणि त्यांचे काही महत्वाचे प्लेअर्स नसल्याचा मोठा फटका बसणार आहे. आणि यामुळे याचा फायदा चेन्नईला होणार आहे. मात्र ओपनिंगची जोडी ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंता आहे.सुरेश रैना आणि सुब्रमण्यम बद्रिनाथ ही जोडीही पहिल्या मॅचमध्ये काहीच प्रभाव पाडू शकली नव्हती. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांना याची कसर भरुन काढावी लागणार आहे. या वर्षीच्या लिलावात सर्वाधिक बोली लागलेला रवींद्र जाडेजाची स्पिन बॉलिंग अतिशय बोथट झाली होती. त्यामुळे आर. अश्विनच्या साथीनं त्याला चेन्नईला झटपट विकेट्स मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे. ऍल्बे मॉर्केल आणि डग बॉलिंजरची बॉलिंग चांगली झाली होती. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा टीमला असतील. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या बॅटिंग फॉर्मवरही चेन्नईचं भवितव्य अवलंबून असेल.

 

तर डेक्कन चार्जर्सला या सीझनमध्ये दुखापतींनी चांगलचं ग्रासलं आहे. ईशांत  शर्मा दुखापतीमुळे संपुर्ण सीझनला मुकणार आहे. त्यामुळे ईशांतची कमी या टीमला चांगलीच जाणवणार आहे. सलामीच्या मॅचमध्येच कुमार संगकाराही उपलब्ध होऊ शकणार नाही. इंग्लंडवरुद्ध टेस्ट सुरु असल्यानं त्याला पहिल्याच मॅचला मुकावं लागणार आहे. त्यामुळे कमॅरून व्हाईवर अतिरिक्त जबाबदारी असेल. अमित मिश्रावर स्पिनची जबाबजारी असेल. त्यांचा चार सीझनचा लीडींग विकेटटेकर बॉलर प्रग्यान ओझा मुंबईकडून खेळतोय. त्यामुळे अमित मिश्राचा फॉर्म त्यांच्यासाठी निर्णायक ठरेल. आता. बलाढ्य चेन्नई सुपकिंग्जला पराभूत करण्याची किमया लो-प्रोफाईल डेक्कन चार्जर्स करते का? याकडेच चाहत्यांच लक्ष असणार आहे.

 

Tags: