गेलचा झंझावात, बंगळूरने दिल्ली केली काबीज

ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा घोंघावले आणि त्याबळावर बंगळूरने प्ले ऑफसाठी आपले चॅलेंज कायम राखले. गेलने ६२ चेंडूत तब्बल १३ षटकार आणि ७ चौकारांसह १२८ धावांचा पाऊस पाडला. २१५ धावांना उत्तर देताना वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थित दिल्लीला आपला गड राखता आला नाही. दिल्लीचा संघ ना ९ बाद १९४ पर्यंत मजल मारली.

Updated: May 18, 2012, 11:34 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा घोंघावले आणि त्याबळावर बंगळूरने प्ले ऑफसाठी आपले चॅलेंज कायम राखले. गेलने ६२ चेंडूत तब्बल १३ षटकार आणि ७ चौकारांसह १२८ धावांचा पाऊस पाडला. २१५ धावांना उत्तर देताना वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थित दिल्लीला आपला गड राखता आला नाही. दिल्लीचा संघ  ना ९ बाद १९४ पर्यंत मजल मारली.

गेलला विराट कोहलीने ५३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची साथ दिली. मग बंगळूरुने १ बाद २१५ धावांचा ऐव्हरेस्ट रचला. रॉस टेलरच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने बंगळूरुला जबरदस्त प्रतिउत्तर देताना ९ बाद १९४ पर्यंत मजल मारली. २६ चेंडूत ५५ धावा ठोकताना टेलरला वेणुगोपाल रावने (२४ चेंडूत ३६) चांगली साथ दिली. पण मुरलीधरनच्या गोलंदाजीवर हर्षेल पटेलने रावचा सीमारेषवर अफलातून झेल टीपत ही जोडी फोडली. १७ व्या षटकात टेलरला विनयकुमारने परत पाठविले. त्यानंतर आंद्रे रशेलने १५ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. पण शेवटी हे प्रयत्न अपुरेच ठरले.

बंगळूरुने गुणतालिकेत चेन्नईशी बरोबरी केली असून त्यांची एक लढतीही शिल्लक आहे. याशिवाय गेलच्या धुलाईने रनरेटही सुधारला आहे. वरुण एरॉनने दिलशानला (१०) इरफानकरवी झेलबाद केल्यानंतर या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजीवर हुकुमत गाजवली ती शेवटपर्यंत. १३ व्या षटकात आरसीबीच्या १००धावांच फलकावर होत्या, पण नंतरच्या आठ षटकात या जोडीने तब्बल ११५ धावा कुटल्या.

गेलने पहिल्या ५० धावा काढण्यास ३७ चेंडू घेतले. पण नंतरच्या ५० धावा त्याने फक्त १३ चेंडूत पूर्ण केल्या. विराटने आपले अर्धशतक ४१ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने पूर्ण केले.गेल-विराटची २०४ धावांची भागीदारी आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च भागीदारीही ठरली. एका सत्रात सर्वाधिक धावा काढण्याचा सचिनचा विक्रम गेलने मोडला. सचिनने २०१०च्या सत्रात ६१८ धावा चोपल्या होत्या.