टीम इंडियाचे सिडनीतही लोटांगण

मेलबर्ननंतर सिडनीतही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. सिडनीमध्येही धोनी एँण्ड कंपनीच्या खराब कामगिरीची मालिका कायम राहिली.

Updated: Jan 6, 2012, 12:22 PM IST

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

www.24taas.com , सिडनी

 

मेलबर्ननंतर सिडनीतही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. सिडनीमध्येही धोनी एँण्ड कंपनीच्या खराब कामगिरीची मालिका कायम राहिली.

 

कांगारूंनी टीम इंडियाला  एक डाव आणि ६८ रन्सनी  पराभूत करत चार टेस्टच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेतली आहे. टेस्ट वाचवण्यासाठी बॅट्समनला विकेटवर टिकणं महत्त्वाच होत. मात्र कांगारूंच्या भेदक मा-यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समनने मेलबर्नप्रमाणेच सिडनीमध्येही शरणागती पत्करली. सचिन ८०  रन्सवर आऊट झाला आणि त्याच्या महासेंच्युरीची प्रतीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली. पहिल्या इनिंगमध्ये १९१ रन्सवरच ऑल झालेली टीम इंडिया दुस-या इनिंगमध्ये   ४०० रन्सवर ऑल आऊट झाली.

 

ऑस्ट्रेलियाकडून बेन हॉलिफन्सहॉल्सने सर्वाधिक   विकेट्स घेतल्या. सिडनीमध्ये तर बॉलर्स आणि बॅट्समन या दोन्हीही आघाड्यांवर टीम इंडियाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सची पिस काढत कांगारूंनी रन्सच्या रन्सच्या अक्षरश: राशी रचल्या. माइकल क्लार्कने शानदार ट्रिपल सेंच्युरी झळकावली. तर रिकी पॉन्टिंग आणि माइक हसीने प्रत्येकी दमदार सेंच्युरी झळकावली. आता पर्थमध्ये कमबॅक करण्याची अखेरची संधी टीम इंडियाकडे असणार आहे.

 

[jwplayer mediaid="24587"]