कांगारूंची 'माती', इंडियाच्या काही नाही 'हाती'

मेलबर्न येथे सुरू असणाऱ्या ऑस्ट्रेलिया श्रीलंका या मॅचकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला या मॅचमध्ये श्रीलंकेला हरवावे अशीच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

Updated: Mar 2, 2012, 05:30 PM IST

www.24taas.com, मेलबर्न

 

भारताचे लक्ष लागून राहिलेल्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामधील मॅचमध्ये अटीतटीच्या सामन्यात लंकेने ९ रनने बाजी मारली आहे. त्यामुळे लंकेने विजय मिळवल्याने टीम इंडियाला मात्र रिर्टन तिकीट मिळाले आहे.  तसचं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने लंकेने आता सीबी सिरीजच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फायनलमध्ये खेळण्याचा आशा धुळीला मिळाल्या आहेत.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हस्सीने सर्वाधिक ७४ बॉल मध्ये ७४ रन केले. त्याने शेवटपर्यंत मॅच जिकंण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते सारे प्रयत्न विफल ठरले. तर लंकेकडून मलिंगाने सर्वाधिक चार विकेट घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. तर कुलशेखराने दोन विकेट घेतल्या. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १० रन हवे असताना मात्र लंकेने शेवटची विकेट काढली. आणि मॅच सहजपणे खिशात टाकली.

 

ऑसीनी मॅचमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे मॅच ही रंगतदार अवस्थेत पोहचली होती. त्यामुळे जिंकण्यासाठी ऑसी प्रयत्न करत असल्याने लंकेचे देखील धाबे दणाणले होते. लंका हरल्यास भारताचे फायनलचे तिकटही कन्फर्म होणार होते.

 

भारताला सीबी सिरीजच्या फायनलमध्ये खेळणाचे असल्यास आज श्रीलंकेला ऑसींनी हरवणं गरजेचं होते. मात्र ऑसी बॅट्समनने नेहमीप्रमाणे त्यांच्या लौकिला साजेशी बॅटींग न करता लंकन बॉलरपुढे नांगी टाकली.

 

त्यामुळे ही मॅच जिंकून लंका फायनलमध्ये जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार. फक्त २३९ रनचं आव्हान असताना ऑसीची सुरवात अत्यंत खराब झाली. त्यांचे पहिले ३ बॅट्समन लवकरच आऊट झाले त्यानंतर कॅप्टन वॉटसने अर्धशतकी खेळी केली. पण इतर कोणीही टीकू शकलं नाही.

 

ऑस्ट्रेलिय़न फास्ट बॉलर डॅनियल ख्रिस्टियननं मेलबर्नमधल्या श्रीलंकेविरूद्ध मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली आहे. त्यानं थिसारा परेरा, सुचित्रे सेनानायके आणि नुआन कुलसेकराला लागोपाठ आऊट केलं.

 

वन-डे क्रिकेटमधील ही ३१ वी हॅटट्रिक ठरली आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून हॅटट्रिक घेणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी कांगारूंकडून ब्रुस रेडनं न्यूझीलंडविरुद्ध, ऍन्थॉनी स्टुअर्टनं पाकिस्तानविरुद्ध आणि ब्रेट लीनं केनियाविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. तर या हॅटट्रिकच्या जोरावर श्रीलंकेला २३८ रनमध्येच गुंडाळंलं आहे

 

मेलबर्न येथे सुरू असणाऱ्या ऑस्ट्रेलिया श्रीलंका या मॅचकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला या मॅचमध्ये श्रीलंकेला हरवावे अशीच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला हरवणार की, श्रीलंका ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. पण श्रीलंकेची सुरवात खराब झाली त्यांचे दोन्ही ओपनर झटपट आऊट झाल्याने श्रीलंका अडचणीत सापडली होती, मात्र लंकेचा कॅप्टन त्यांचा मदतीला धावून आला. तर त्याला चंदीमलनेही योग्य साथ दिली. त्यामुळे श्रीलंका सुस्थिर स्थितीत आहे. या दोघांनी आपआपली अर्धशतकं झळकावली आहेत. पण त्यानंतर संगकाराला आऊट करण्यात यश आलं आहे. श्रीलंकेने ३० ओव्हरमध्ये १४४ पर्यंत मजल मारली आहे. तर त्याबदल्यात तीन विकेट गमवल्या आहेत.

 

सीबी सीरिजच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण खेळणार हे लीगच्या शेवटच्या मॅचपर्यंत तरी स्पष्ट झालेल नाही. आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेतील मॅचच्या निर्णयावर टीम इंडिया किंवा श्रीलंका यापैकी कोण फायनल खेळेल ते स्पष्ट होईल. ऑस्ट्रेलियानं यापूर्वीच फायनल मध्ये जागा नक्की केली आहे. आजची मॅच जर श्रीलंकेन जिंकली तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनल होईल आणि कांगारुंनी लंकेवर विजय मिळवला तर भारताचा फायनलसाठी मार्ग मोकळा होईल. त्यामुळे या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं लंकेला नमवावं अशी प्रार्थना टीम इंडियाचे चाहते करत आहेत.