कुस्तीपटू नरसिंगला १५ लाखांची मदत

लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादवला अखेर महाराष्ट्र शासनानं १५ लाखांची मदत जाहीर केलीय. 'झी 24 तास'नं केलेल्या पाठपुराव्याची अखेर सरकारनं दखल घेत, मदतीचा हात पुढे केला आहे.

Updated: May 10, 2012, 09:37 AM IST

www.24taas.com,मुंबई

 

 

लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादवला अखेर महाराष्ट्र शासनानं १५ लाखांची मदत जाहीर केलीय. 'झी 24 तास'नं केलेल्या पाठपुराव्याची अखेर सरकारनं दखल घेत, मदतीचा हात पुढे केला आहे.

 

 

लंडन ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय झालेल्या नरसिंग यादववर सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मात्र त्याला खरी गरज होती, ती मदतीची. नरसिंगच्या मदतीसाठी 'झी 24 तास'नं सरकारकडे पाठपुरावा केला. सरकारनंही त्याला पंधरा लाखांची मदत जाहीर केली. राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत नरसिंग यादवनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चव्हाण यांनी त्याचं अभिनंदन करुन लंडन ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या नरसिंगला क्लास वन ऑफिसरची नोकरी देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात आलं होतं.  'झी 24 तास'च्या बातमीनंतर क्रीडामंत्री पद्माकर वळवींनीही मदतीचे आश्वासन दिले होते. नरसिंग यादवला मदत तर मिळालीय. मात्र दिल्ली आणि हरियाणात खेळाडुंना दिल्या जाणा-या सुविधाही देण्याची त्यानं मागणी केलीय. यालाही सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे.

 

व्हिडिओ  पाहा:

 

[jwplayer mediaid="97870"]