अजिंक्य राहाणेचा झंझावात

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अजिंक्य रहाणे सात मॅचेसमध्ये 319 रन्स काढून अव्वल स्थानी आहे. त्यानं या सीझनमध्ये आत्तापर्यंत एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.

Updated: Apr 23, 2012, 08:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राहुल द्रविडसाठी अजिंक्य़ रहाणे आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये हुकमी एक्का ठरतोय. राजस्थानच्या टीमचं हे ट्रम्प कार्ड सध्या हमखास चालतंय. त्यामुळे बंगळुरु रॉयल चॅलेंजर्ससाठी तो चांगलाचं धोकादायक ठरणार आहे.

 

राजस्थान रॉयल्सच्या टीमनं  आयपीएलच्या या सिझनमध्ये अंडरडॉग्ज म्हणून सुरुवात केली. ओपनिंग बॅट्समन अजिंक्य रहाणेचा झंझावात आणि टीमच्या रॉयल कामगिरीनं राजस्थानं या सीझनमध्ये अनेक दिग्गज टीम्सला तडाखा दिलाय. आता, बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या मॅचमध्येही अजिंक्यकडून टीमला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार.  पाचव्या सीझनधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावण्याचा मानही  अजिंक्यनं पटकावला. या इनिंगमध्ये त्यानं टी-20 मध्ये सर्रास वापरण्यात येणार-या स्कूप, स्विच हिट आणि पॅडल स्विप शॉर्टचा वापरही केला नव्हता. त्यानं कॉपी बूक स्टाईलनं बॅटिंग करत टीमला विजश्री मिळवून देता येते हे सिद्ध करुन दाखवलं होतं. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो सध्या नंबर वनवर आहे.

 

क्रिकेटपटू  मॅचेस रन्स सर्वोत्तम सरासरी

रहाणे        7     319    103*   53.16

 

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अजिंक्य रहाणे सात मॅचेसमध्ये 319 रन्स काढून अव्वल स्थानी आहे.  त्यानं या सीझनमध्ये आत्तापर्यंत एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.  अजिंक्यच्या धडाक्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्सनाही त्याला रोखण्याचं मोठ आव्हान असणार आहे. या सीझनमध्ये त्याची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. त्यामुळे या मॅचमध्येही त्याला राजस्थानच्या तारणहाराची भूमिक चोखपणे पार पाडावी लागणार आहे.