www.24taas.com, लंडन
मंगळ ग्रहावर जीवनसृष्टी असल्याची शक्यता असल्यामुळे या वर्षी ऑगस्टमध्ये नासा मंगळावर नवं रोव्हर पाठवणार आहे.
'द टेलीग्राफ' मध्ये दिल्या गेलेल्या बातमीनुसार नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने हे रोव्हर अंतराळयानातून मंगळावर अलगद उतरवण्यात येईल. या कार्यक्रमाला ‘मिशन क्युरिऑसिटी’ असं नाव देण्यात आलं आहे. रोव्हर जेव्हा मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचेल, तेव्हा २५ फूट लांबीची दोरी कापण्यात येईल.
अर्थात, हे मिशन म्हणजे एक प्रकारचा जुगारच असणार आहे. कारण हे मिशन यशस्वी झाले नाही, तर २.५ अब्ज डॉलर्सचं नुकसान होणार आहे.