www.24taas.com, मुंबई
राज्यसभा निवडणूकीतले अपक्ष उमेदवार संजय काकडे यांनी माघार घेतलीय. त्यामुळं महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काकडे यांनी माघारीच्या अर्जांवर सह्या केल्या.
आता उद्या अधिकृतपणे काकडे आपला अर्ज मागं घेतील. काकडे यांच्या माघारीने आता महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय. यात काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेना आणि भाजपचा 1 उमेदवार निवडून येईल.
काल राष्ट्रवादीने डी.एन.त्रिपाठींच्या नावाला मनसेचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेत आमदार प्रकाश बिनसाळेंनी डमी अर्ज भरला होता.
राष्ट्रवादीने काळजी घेत तीन उमेदवार रिंगणात उतरवण्याची खेळी खेळली होती. आता बिनसाळेही माघार घेतील. राष्ट्रवादीतर्फे आता वंदना चव्हाण आणि डी.एन.त्रिपाठी बिनविरोध निवडून जातील हे जवळपास नक्की झालं आहे.